भारत महाशक्ती बनण्याच्या सिद्धतेत ! – अमेरिका

नवी देहली – भारतासमवेतचे द्विपक्षीय संबंध हे अमेरिकेसाठी महत्त्वाचे आहेत. एक वस्तूस्थिती अशी आहे की, मागच्या २० वर्षांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जे संबंध प्रस्थापित झाले, ते इतरांपेक्षा वेगळे आहेत. ते गतीने भक्कम होत गेले.

‘व्हाईट हाऊस’च्या एशिया धोरणाचे समन्वयक कॅम्पबेल

भारत हा अमेरिकेचा एक सहकारीच नाही, तर तो एक स्वतंत्र, शक्तीशाली देश बनण्याची सिद्धतेत आहे. एक महाशक्ती म्हणून भारत पुढे येऊ पहात आहे, असे अमेरिकेने भारताविषयी म्हटले आहे. ‘ऐस्पन सेक्युरिटी फोरम’ने आयोजित केलेल्या बैठकीत भारताशी संबंधित चर्चा झाली. यामध्ये ‘व्हाईट हाऊस’च्या एशिया धोरणाचे समन्वयक कॅम्पबेल यांनी वरील विधान केले.