वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या सैन्याने एक नवीन चौकी बनवली आहे. यातून चीनच्या आक्रमकतेचे चिंताजनक संकेत दिसत आहेत. हे संकेत ‘भारत आणि अन्य देशांच्या सुरक्षेविषयीचे अमेरिकेचे प्रयत्न अधिक सशक्त झाले पाहिजे’, हेच नमूद करत आहेत.
अमेरिकी सांसद कृष्णमूर्ति ने दुनिया को बताई चीन की चाल, LAC के पास सेना की चौकी बनाकर एक और चिंताजनक संकेत दे रहा ड्रैगन#china #LAC https://t.co/IsQzvTVMy8
— India TV Hindi (@IndiaTVHindi) December 1, 2022
लडाख येथील पँगोंग त्सो भागात चीनने सैनिकांना रहाण्यासाठी एक मुख्यालयाची निर्मिती केल्याची माहिती अमेरिकेतील एका दैनिकाने दिली आहे. त्याविषयी कृष्णमूर्ती बोलत होते.
संपादकीय भूमिका‘चीन भारताच्या सीमेवर काय करत आहे ?’, हे अमेरिकेच्या खासदाराकडून भारताला समजते, हे लज्जास्पद ! भारत सरकारनेच स्वतःहून भारतियांना याची माहिती देणे आवश्यक आहे ! |