अमेरिकेची राज्यघटना रहित केली पाहिजे ! – डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि वर्ष २०२४ मधील रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमांतून एक पोस्ट प्रसारित केली आहे. त्यात त्यांनी ‘वर्ष २०२० च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत माझा विजय झाला होता’, असा पुन्हा एकदा दावा केला आहे. तसेच त्यांनी, ‘मोठ्या तंत्रज्ञान आस्थापनांनी माझ्या विरोधात डेमोक्रॅटिक पक्षाला साहाय्य केले होते’, असा आरोप केला. या पोस्टमध्ये त्यांनी ‘अमेरिकेची राज्यघटना रहित केली पाहिजे’, अशीही मागणी केली. या मागणीनंतर अमेरिकेमध्ये खळबळ उडाली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाकडून ट्रम्प यांच्यावर टीका करण्यात आली आहे.