चीनमधील सरकारविरोधी आंदोलनाला अमेरिकेचा पाठिंबा

वॉशिंग्टन (अमेरिका) – चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून चीन सरकारच्या विरोधात, तसेच कोरोनाच्या संदर्भातील धोरणांच्या विरोधात चालू असलेल्या नागरिकांच्या आंदोलनाला अमेरिकेने पाठिंबा दिला आहे.

अमेरिकेने म्हटले आहे की, चीनची ‘झीरो कोविड पॉलिसी’ (शून्य कोरोना नीती) काम करू शकणार नाही. आम्हाला वाटते अशा प्रकारच्या धोरणांद्वारे कोरोनावर नियंत्रण मिळवणे अवघड आहे. आम्ही जगातील कोणत्याही देशात चालू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला पाठिंबा देतो. प्रत्येकाला अशा प्रकारचे आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आम्ही चीनमधील घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहोत. आम्ही कोरोना प्रतिबंधक लसीचे सर्वांत मोठे निर्यातदार आहोत; मात्र चीनने आमच्याकडे लसींची मागणी केलेली नाही.