२६/११ च्या सूत्रधारांना शिक्षा करा !

न्यूयॉर्क येथील पाकिस्तानी दूतावासाबाहेर भारतियांची निदर्शने !

न्यूयॉर्क येथील पाकिस्तानी दूतावासाबाहेर भारतियांची निदर्शने

न्यूयॉर्क (अमेरिका) – मुंबईवरील २६/११ च्या आतंकवादाच्या १४ व्या वर्षानिमित्त येथील भारतियांना पाकिस्तानच्या दूतावासाबाहेर निदर्शने केली. पाकने या आक्रमणाच्या सूत्रधारांना शिक्षा करावी, अशी मागणी निदर्शक भारतियांनी केली. या वेळी त्यांया हातात फलक होते. यावर ‘वन्दे मातरम्’ ‘भारत माता की जय’, ‘आम्ही क्षमा करणार नाही आणि विसरणार नाही’, ‘पाकिस्तानवर बंदी घाला’, असे लिहिण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

गेल्या १४ वर्षांत पाकने या सूत्रधारांना शिक्षा केलेली नाही आणि पुढेही तो करण्याची शक्यता नाही. पाकला भारताने सैनिकी कारवाई करूनच धडा शिकवणे आवश्यक आहे !