‘आर्.आर्.आर्.’ या भारतीय चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला मिळाला ‘गोल्डन ग्लोब’चा पुरस्कार !

जगप्रसिद्ध ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार सोहळ्यात ‘आर्.आर्.आर्.’ या भारतीय हिंदी चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे. संगीतकार एम्.एम्. कीरावानी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

रशियाच्या शस्त्रसाठ्यामध्ये ७५ टक्के घट झाल्याने आक्रमणाची धार बोथट ! – अमेरिकेचा दावा

अमेरिकेचे म्हणणे आहे की, रशियाने आतापर्यंत क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केला होता; मात्र आता शस्त्रसाठ्यामध्ये घट होऊ लागल्याने तो जुनी शस्त्रे वापरत आहे.

मेक्सिकोमध्ये चकमकीत १९ तस्कर आणि १० सैनिक ठार

अमली पदार्थ माफिया आणि सैनिक यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये १० सैनिक आणि १९ अमली पदार्थ तस्कर ठार झाले. अमली पदार्थ तस्करांनी जाळपोळ केली आणि रस्ते बंद केले.

अमेरिकेत होत आहे मानवी मृतदेहापासून खताची निर्मिती !

अध्यात्माचे काडीचेही ज्ञान नसल्याने सुधारणावादाच्या नावाखाली असले विकृत प्रकार पाश्‍चात्त्यांना सुचतात ! मृतदेहावर अग्नीसंस्कार हा सर्वच अंगाने योग्य प्रकार आहे.

रशिया-युक्रेन यांच्यामध्ये शांतता नांदण्यासाठी भारताची भूमिका महत्त्वाची ! – अमेरिका

युक्रेनमधील विध्वंसाला रशियाला उत्तरदायी धरण्यासाठी काय करता येईल ?’, यासंदर्भात अमेरिका भारतासह इतर मित्र देशांच्या नियमित संपर्कात आहे.

(म्हणे) ‘मुसलमानेतर अल्लाचे शत्रू असल्याने तुमचेही शत्रू !’

कॅनडाच्या इमाम शेख युनूस कथराडा याचे मुसलमानांना द्वेषपूर्ण आवाहन !

गूगल ‘ज्यू’द्वेषीच ! – अमेरिकी संस्थेचा आरोप

हिंदु धर्म, हिंदू यांनाही गूगल, विकिपीडिया, तसेच अनेक संकेतस्थळे हिणवत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. याविरोधात हिंदू कधीच काही करतांना दिसत नाहीत, हे हिंदूंसाठी लज्जास्पद !

अमेरिकेमध्ये ‘बाँब’ चक्रीवादळामुळे मृतांची संख्या ६० हून अधिक

अमेरिकेत ‘बाँब’ चक्रीवादळामुळे मृतांची संख्या ६० हून अधिक झाली आहे. न्यूयॉर्क शहरात चक्रीवादळामुळे सर्वाधिक म्हणजे २८ जणांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. बर्फात गाडलेल्या वाहनांमध्ये अनेक जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे.

अमेरिकेमध्ये ‘बाँब’ चक्रीवादळामुळे ३४ जणांचा मृत्यू

अमेरिकेमध्ये ‘बाँब’ चक्रीवादळामुळे कडक्याची थंडी पडली आहे. यात आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. कॅनडामध्येही ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेच्या ‘मरीन’ सैन्यामध्ये भरती होणार्‍या शिखांना दाढी ठेवण्याची आणि पगडी घालण्याची अनुमती

अमेरिकेच्या ‘मरीन’ (नौदलाप्रमाणे कार्य करणारे) सैन्यात  भरती होणार्‍या शिखांना दाढी ठेवण्याची आणि पगडी घालण्याची अनुमती येथील एका न्यायालयाने दिली आहे.