कॅनडाच्या इमाम शेख युनूस कथराडा याचे मुसलमानांना द्वेषपूर्ण आवाहन !
(इमाम म्हणजे मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा)
ओटावा (कॅनडा) – मुसलमानेतर ज्यात ख्रिस्ती, ज्यू आणि अन्य नास्तिक सहभागी आहेत, ते अल्लाचे शत्रू आहेत. तुम्हाला वाटते का ते तुमचे मित्र आहेत ? नाही. जर ते अल्लाचे शत्रू असतील, तर ते तुमचे मित्र कसे असू शकतात ? मला वाटते की, आपल्या मुलांना हे चांगल्या प्रकारे समजावून सांगितले पाहिजे. ते अल्लाचे शत्रू असल्याने ते तुमचेही शत्रू आहेत. यांतील काही मुसलमानेतरांचा तर अल्लाच्या अस्तित्वावरच विश्वास नाही. तुम्ही अशांना तुमचे मित्र बनवू शकत का ?, अशा प्रकारची द्वेषपूर्ण विधाने कॅनडातील इमाम शेख यूनुस कथराडा याने केली आहेत. त्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. अमेरिकेतील ‘मिडिल ईस्ट मीडिया रिसर्च इन्स्टिट्यूट’चे ट्विटर खाते ‘मेमरी’ यावरून हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. युनूस याचे असे अनेक व्हिडिओ त्याच्या सामाजिक माध्यमांवरील खात्यांवरून प्रसारित झाले आहेत; मात्र त्यांवर अद्यापही कारवाई झालेली नाही.
Canadian Imam Younus Kathrada: Non-Muslims Are Our Enemies – Our Children Must Understand This; May Allah Annihilate the Heretics and the Atheists #Canada #Jews #Christians #Antisemitism pic.twitter.com/s29NoV2Sjf
— MEMRI (@MEMRIReports) January 6, 2023
या व्हिडिओच्या शेवटी युनूस, ‘अल्ला, इस्लाम आणि मुसलमान यांना शक्ती दे. काफीर (मूर्तीपूजक) आणि देवतांची पूजा करणारे यांचा अपमान कर. इस्लामच्या शत्रूंचा आणि काफिरांचा नायनाट कर’, अशी प्रार्थना करतांना दिसत आहे.
संपादकीय भूमिका
|