‘आर्.आर्.आर्.’ या भारतीय चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला मिळाला ‘गोल्डन ग्लोब’चा पुरस्कार !

बेव्हर्ली हिल्स (कॅलिफोर्निया, अमेरिका) – बेव्हर्ली हिल्स (कॅलिफोर्निया, अमेरिका) – येथील जगप्रसिद्ध ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार सोहळ्यात ‘आर्.आर्.आर्.’ या भारतीय चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे. संगीतकार एम्.एम्. कीरावानी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. चित्रपटाचे दिग्दर्शक राजामौली, अभिनेते रामचरण तेज आणि ज्युनियर एन्.टी.आर्. हे या वेळी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी याविषयी अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट ‘ऑस्कर’ पुरस्काराच्याही शर्यतीत आहे. यापूर्वी ‘गोल्डन ग्लोब’ या पुरस्कारासाठी वर्ष १९५७ मध्ये दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या ‘दो आँखे बारह हाथ’ या चित्रपटाला नामांकन मिळाले होते.