अमेरिकेमध्ये ‘बाँब’ चक्रीवादळामुळे ३४ जणांचा मृत्यू

अमेरिकेतील ‘बाँब’ चक्रीवादळ

न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेमध्ये ‘बाँब’ चक्रीवादळामुळे कडक्याची थंडी पडली आहे. यात आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. कॅनडामध्येही ४ जणांचा मृत्यू झाला आहे. या वादळाचा परिणाम मेक्सिकोमध्येही दिसून येत आहे.

१. अमेरिकेत अनेक ठिकाणी रस्त्यावर बर्फाचा थर जमा झाल्याने रुग्णांपर्यंत रुग्णवाहिका पोचू शकत नाहीत. अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. यासह सहस्रो कोटी रुपयांचा व्यवसायदेखील ठप्प झाला आहे.

२. चक्रीवादळाची झळ ३ सहस्र २०० किलोमीटर क्षेत्राला बसली आहे. न्यूयॉर्क राज्यातील बफेलो शहरात ८ फूट बर्फ साचला होता. प्रतिकुल हवामानामुळे गेल्या ४८ घंट्यांत १० सहस्रांहून अधिक विमान उड्डाणे रहित करण्यात आलेली आहेत.