‘रशिया-युक्रेन युद्ध ही पाश्चात्त्य राष्ट्रांना अल्लाने दिलेली शिक्षा !’ – इस्लामिक स्टेट

अफगाणिस्तानमध्ये लोक उपाशी आहेत, तेथे तालिबान्यांच्या राजवटीत लोकांचे हाल होत आहेत. तेथील लोकांना कोण शिक्षा करत आहे, हेही इस्लामिक स्टेटने सांगावे !

युक्रेन ‘नाटो’च्या सदस्यत्वाचा आग्रह सोडणार !  

तिसर्‍या फेरीमध्ये रशियाने काही अटी ठेवल्या होत्या. ‘त्या पूर्ण केल्या, तरच युद्ध थांबवू’, असे रशियाने म्हटले होते. त्यामध्ये एक अट ‘युक्रेनने ‘नाटो’मध्ये सहभागी होऊ नये’, ही होती.

ब्रिटनच्या राणीच्या सुरक्षेतील ४ सैनिक युक्रेनमध्ये रशियाच्या विरोधात लढण्यासाठी गेल्याची शक्यता !

रशियाने या सैनिकांना पकडल्यास या युद्धात ब्रिटनचा सहभाग असल्यावरून रशियाकडून कारवाईची शक्यता !

रशियाशी लढण्यासाठी युक्रेनच्या सैन्यात सहभागी झाला भारतीय तरुण !

सैनिकेश रविचंद्रन् असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा तमिळनाडूतील कोइंबतूर येथील रहिवासी आहे.

४ अटी मान्य केल्या, तर युद्ध लगेच थांबवू !

युक्रेन आणि रशिया यांच्यात ७ मार्च या दिवशी बेलारूस येथे तिसर्‍या टप्प्याची चर्चा झाली. यामध्ये ‘युक्रेनने जर आमच्या ४ अटी मान्य केल्या, तर आम्ही युद्ध थांबवू’ असे रशियाने सांगितले.

रशियाकडून २०० पेक्षा अधिक शाळा आणि १ सहस्र ५०० रहिवाशी इमारती नष्ट !

रशियन क्षेपणास्त्रांनी युक्रेनची राजधांनी कीव जवळील झायटोमिर येथील एक शाळा उद्ध्वस्त केली आहे. सर्व शैक्षणिक संस्था बंद असल्याने जीवितहानी झाली नाही.

युद्धामुळे जागतिक अन्न टंचाई आणि धान्याची भाववाढ होणार !

‘यारा इंटरनॅशनल’ या खतनिर्मिती करणार्‍या जागतिक आस्थापनाला भीती
युरोप आणि आफ्रिकेत धान्य टंचाईचे संकट

रशियाकडून युक्रेनच्या ४ शहरांमध्ये युद्धविरामची घोषणा

रशियाने युद्धाच्या १२ व्या दिवशी युक्रेनच्या ४ शहरांमध्ये युद्धविरामची घोषणा केली. हा युद्धविराम दुपारी १२.३० ते सायंकाळी ५.५० वाजेपर्यंत असणार आहे.

युक्रेनवर युद्ध लादण्यात आले आहे ! – पोप

युक्रेनवर युद्ध लादण्यात आले आहे. तेथे रक्त आणि अश्रू यांच्या नद्या वहात आहेत. हे युद्धच असून त्यात मृत्यू आणि विध्वंस होत आहे, असे प्रतिपादन ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी येथे केले.

रशियाच्या धमकीमुळे पोलंडचा युक्रेनला लढाऊ विमाने देण्यास नकार

‘जो देश या युद्धात युक्रेनला लढाऊ विमाने देईल त्यांनाही युद्धात सहभागी करून घेतले जाईल’, अशी धमकी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिल्यानंतर पोलंडने त्याची घोषणा मागे घेतली आहे.