चीनच्या कोरोनाग्रस्त हुबेई प्रांतात हिंसाचार
गेल्या ३ मासांपासून येथे लागू केलेल्या दळणवळण बंदीमध्ये चीन सरकारने काही काळासाठी सूट दिल्यामुळे लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे येथे गर्दी वाढून तणाव निर्माण झाला आहे.
गेल्या ३ मासांपासून येथे लागू केलेल्या दळणवळण बंदीमध्ये चीन सरकारने काही काळासाठी सूट दिल्यामुळे लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे येथे गर्दी वाढून तणाव निर्माण झाला आहे.
देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दळणवळण बंदी घोषित केलेली असतांना पोलीस आणि प्रशासन यांची दृष्टी चुकवून आपल्या मूळ गावी जाणार्यांची संख्या वाढली आहे.
कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर श्री सिद्धीविनायक गणपति मंदिर न्यासाच्या वतीने रक्तसंकलन अभियान राबवण्यात येणार आहे. न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर याविषयी म्हणाले की, मुंबईत रहाणार्या ज्यांना रक्तदान करण्याची इच्छा आहे त्यांनी स्वत:चे नाव श्री सिद्धीविनायक मंदिरात सकाळी १० ते…
पोलीस असल्याचे सांगून संचारबंदीचे उल्लंघन केल्याची भीती दाखवून करवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी करणार्या ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जीवनावश्यक वस्तूूच्या विक्रेत्यांनी त्यांची दुकाने चालू ठेवावीत. जीवनावश्यक वस्तूंची विक्री करतांना मालाची साठवणूक करणे, वस्तूंची भाववाढ अथवा विक्रीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नाही. असे करणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल…
भ्रमणभाष, संगणक आणि भ्रमणसंगणक (लॅपटॉप) आदी प्रतिदिन स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्याद्वारेही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे कोरोनाची लागण झालेले रुग्ण तुमच्या आजूबाजूला असतील, तरच हा संसर्ग या उपकरणांच्या माध्यमातून पसरू शकतो.
कोरोनाच्या भीतीमुळे अनेक परप्रांतीय मुंबई सोडून जात असल्याचे पोलीस पडताळणीत आढळून येत आहे. २८ मार्च या दिवशी पालघर येथून दुधाच्या टँकरमधून राजस्थान येथे निघालेल्या १२ नागरिकांना कल्याण येथे पोलिसांनी पकडले.
शासनाच्या सूचनेनुसार कोरोना प्रतिबंधासाठी कोकण विभागाने पाचही जिल्ह्यांत आवश्यक त्या सर्व उपाययोजना आणि नियोजन केले आहे. राज्यात प्रथमच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य, फळे, भाजीपाला यांच्या वाहतूक नियंत्रणासाठी ‘वॉर रूम’ (आपत्ती नियंत्रण कक्ष)…
दिंडोरी तालुक्यातील गणेशगाव शिवारात आंबे दिंडोरी रस्त्यावर असलेल्या एका ‘हॉटेल’वर धाड टाकून ४ सहस्र ६४१ रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील अन्वेषण चालू आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत खारीचा वाटा म्हणून शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार एक मासाचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीस देणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘ट्वीट’द्वारे दिली आहे.