कुणालाही पाठीशी न घालता वरिष्ठ पातळीवर चौकशी करून दोषींवर कारवाई करू ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री

माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी. यासंदर्भातील सर्व व्हिडिओ क्लिपची सत्यता पडताळावी-किरीट सोमय्या

बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या वेळी विरोधी पक्षांची तोंडे बंद होती !  

पंतप्रधान मोदी यांची विरोधी पक्षांच्या बैठकीवर टीका

अफगाणिस्तान ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ला आश्रय देत असल्यानेच पाकमध्ये आतंकवादी आक्रमणांत वाढ ! – पाकच्या सैन्याचा आरोप

तालिबानला मोठ्या करणार्‍या पाकला आज तोच तालिबान डोईजड झाला आहे. संकटात सापडलेल्या पाकला त्याचे हे दुष्कर्मच उत्तरदायी आहे, याला कोण काय करणार ?

(म्हणे) ‘सकाळी दारु पिणार्‍यांविषयी वाईट बोलू नये !’ – मंत्री मुथुसामी

मंत्रीच असे बोलत असतील, तर तमिळनाडूमध्ये नैतिकता शिल्लक राहील का ? याचा लहान मुलांवर काय परिणाम होईल ?, याचा तरी ते विचार करतील का ?

सीमा हैदर आणि सचिन यांची उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाकडून दुसर्‍या दिवशीही चौकशी

सीमा हैदर पाकची गुप्तहेर असल्याचे चौकशीत सिद्ध झाल्यास तिला आणि सचिन या दोघांनाही अटक होऊ शकते.

गरीब रुग्णांना सेवा नाकारणार्‍या धर्मादाय रुग्णालयांवर कारवाई करणार ! – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

त्यांनी १७ जुलै या दिवशी केईएम् आणि नायर रुग्णालयांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.

उज्जैन (मध्यप्रदेश) येथे भगवान महाकालच्या पालखी यात्रेमध्ये सहभागी झालेल्यांवर छतावरून थुंकणार्‍या ३ मुलांना अटक !

हिंदूंच्या धार्मिक यात्रांत अशा प्रकारची कृत्ये करण्याचे धाडस होणे बहुसंख्य हिंदूंना लज्जास्पद !

मुंबईतील ६६३ रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’च नाही !

उदय सामंत म्हणाले, ‘‘राज्यातील सर्वच रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’ ९० दिवसांत करण्यात येईल.’’ मागील काही वर्षांत राज्यात वसई, भंडारा, अमरावती आदी जिल्ह्यांत रुग्णालयांत आग लागून रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

पाकिस्तानमधील सिंध प्रांतात मंदिरांच्या सुरक्षेसाठी ४०० हिंदु पोलीस तैनात !

विशेष म्हणजे सिंधमधील मारीमाता मंदिर पाडण्यात येत होते, तेव्हा मंदिर पाडणार्‍यांना पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले होते, असे वृत्त पाकमधील प्रसिद्ध दैनिक ‘डॉन’ने प्रकाशित केले होते.

गोवा : सदानंद शेट तानावडे राज्यसभेचे खासदार घोषित

आज औपचारिकरित्या त्यांचे खासदारपद घोषित करण्यात आले. राज्यसभेसाठी भाजपचे विधानसभेत बहुमत होते. हे लक्षात घेऊन विरोधी पक्षांनी त्यांचा उमेदवार उभा केला नव्हता. त्यामुळे सदानंद शेट तानावडे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड निश्‍चित झाली होती.