(म्हणे) ‘सकाळी दारु पिणार्‍यांविषयी वाईट बोलू नये !’ – मंत्री मुथुसामी

तमिळनाडूचे मंत्री मुथुसामी यांचे विधान !

डावीकडे मंत्री मुथुसामी

चेन्नई (तमिळनाडू) – सकाळी सकाळी दारु पिणार्‍यांविषयी वाईट बोलू नये. जर कुणी सकाळी दारु पित असेल, तर त्याला ‘दारुड्या’ म्हणू नये. जे सकाळी दारु पितात, त्यांची गोष्ट वेगळी आहे. जे शारीरिक श्रम करणे सोडून देत आहेत, ते दारु पित आहेत. यापासून ते स्वतःला परावृत्त करण्यास असमर्थ आहेत, हे आपल्याला समजून घ्यावे लागेल, असे विधान तमिळनाडू सरकारमधील मंत्री मुथुसामी यांनी केले. विशेष म्हणजे मुथुसामी यांनी यापूर्वीही ‘सकाळी ७ ते ९ या वेळेत कामावर जाणार्‍यांना दारु विकण्याविषयी चर्चा करण्याची आवश्यकता आहे’, असे विधान केले होते.

संपादकीय भूमिका

मंत्रीच असे बोलत असतील, तर तमिळनाडूमध्ये नैतिकता शिल्लक राहील का ? याचा लहान मुलांवर काय परिणाम होईल ?, याचा तरी ते विचार करतील का ?