धर्मांधांच्या विरोधानंतर पोलीस अधिकारी नियंबित
गोरखपूर (उत्तरप्रदेश) – येथील तुर्कमानपूरमध्ये मशिदीबाहेर एका इमामाला पोलीस अधिकार्याने दळणवळण बंदीचे उल्लंघन केल्यामुळे चोपल्यानंतर तणाव निर्माण झाला. धर्मांधांच्या जमावाने येथील चौकीतील पोलिसांना घेरले. याची माहिती पोलीस ठाण्यातील अधिकार्यांना दिल्यावर घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस पोचले. सध्या येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. इमामाला मारहाण करणार्या पोलीस अधिकार्याला निलंबित करण्यात आले आहे.
इमामाने आरोप केला की, पोलीस निरीक्षकाने त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली, तसेच बंदूक दाखवून धमकी दिली. या घटनेची माहिती मिळाल्यावर धर्मांधांनी अधिकार्याला निलंबित करून गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. पोलीस अधिकार्याचे म्हणणे आहे की, दळणवळण बंदीचे नियम पाळण्याविषयी लोकांना सांगण्यात येत होते, तेव्हा इमामाने जमावाला भडकावल्यावर जमावाने आक्रमण केले.