नगर येथे ३० एप्रिलपर्यंत दशक्रिया विधी न करण्याचा पुरोहित संघटनेचा निर्णय !

अंत्यविधी आणि दशक्रियाविधी यांना होणार्‍या गर्दीमुळे अमरधाम येथे दशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित कोरोनाबाधित झाले आहेत.

शिवरायांचे मुस्लिम मावळे असा उल्लेख करून जातीचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न !

कोणताही पुरावा नसतांना रायगडावर मशीद बांधली असे खोटे सांगून शिवरायांचे मुस्लिम मावळे हे पोस्टर पुणे महानगरपालिका येथे लावण्यात आले.

जमावबंदी असतांना मोर्चा काढला म्हणून आयोजकांवर गुन्हा नोंद !

आपत्काळात समाजाला शिस्त लावण्यासाठी त्वरित कठोर शिक्षा होणेच आवश्यक आहे.

पुणे विद्यापीठाच्या पतपेढीमध्ये आर्थिक घोटाळे होत असल्याने संचालकांचा राजीनामा !

पुणे विद्यापिठातील पतपेढीमध्ये होणार्‍या अपव्यवहाराविषयी तक्रार करूनही त्यावर कोणतीच कारवाई न होणे हे गंभीर आहे.

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष ! – डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी

तक्रार निवारण कक्ष-टोल फ्री क्रमांक १०७७ उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिराचा संगीत महोत्सव यंदाही रहित

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्ट वतीने २४ घंटे ऑनलाईन दर्शनाची सोय करण्यात आली असून भाविकांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा.

राष्ट्रीय महामार्ग डांबरीकरणाच्या विक्रमाविषयी संजय कदम यांचा नितिन गडकरी यांच्याकडून सन्मान !

सोलापूर-विजापूर महामार्गाच्या डांबरीकरणाचे काम सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत पूर्ण करून एक नवा विक्रम केला आहे.

सोलापूर येथे संचारबंदीच्या पहिल्या दिवशी २ लाख रुपये दंड वसूल !

नियमाचे उल्लंघन करून रस्त्यांवरून फिरणारी वाहने जप्त केल्यानंतर ३० एप्रिलनंतर दंड भरून परत देण्यात येईल

आजपासून व्यापार चालू करण्याचा निर्णय कायम: संपूर्ण दळणवळण बंदीचा निर्णय झाल्यास व्यापारी सहभागी होणार ! – ललित गांधी, महाराष्ट्र चेंबर

दळणवळण बंदीचा निर्णंय घाल्यास छोट्या व्यापार्‍यांना आर्थिक साहाय्याची मागणी

पुणे येथे महिलेवर वारंवार अत्याचार करणार्‍या कॅबचालकाविरुद्ध गुन्हा नोंद !

महिलांवर अत्याचार करणार्‍यांना कठोर शिक्षा झाल्यासच बलात्कार अशा घटना टळतील !