पुणे येथे महिलेवर वारंवार अत्याचार करणार्‍या कॅबचालकाविरुद्ध गुन्हा नोंद !

महिलांवर अत्याचार करणार्‍यांना कठोर शिक्षा झाल्यासच अशा घटना टळतील !

पुणे, १२ एप्रिल – आयटी आस्थापनात नोकरी करणार्‍या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी कॅबचालक प्रमोद बाबू कनोजिया याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडित महिलेला तहान लागली असता चालकाने गुंगीचे औषध टाकलेले पाणी पिण्यास देऊन तिच्यावर बलात्कार केला. ४ ते ३० मार्च या काळात धायरी परिसरातील एका लॉजवर ही घटना घडली. तसेच त्याने महिलेचे अश्‍लील छायाचित्र काढून ते सामाजिक माध्यमावर टाकण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. महिलेने यासंदर्भात तक्रार दिली आहे.