राष्ट्रीय महामार्ग डांबरीकरणाच्या विक्रमाविषयी संजय कदम यांचा नितिन गडकरी यांच्याकडून सन्मान !

संजय कदम यांचा सन्मान

सोलापूर – सोलापूर ते विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर केवळ १८ घंट्यात २५ किलोमीटरचे डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्याचा विक्रम केल्याविषयी केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संचालक संजय कदम यांचा सन्मान केला. या विक्रमाची वर्ल्ड लिम्का बूकमध्ये नोंद झाली आहे. सोलापूर-विजापूर महामार्गाच्या डांबरीकरणाचे काम सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत पूर्ण करून एक नवा विक्रम केला आहे.