जमावबंदी असतांना मोर्चा काढला म्हणून आयोजकांवर गुन्हा नोंद !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाच्या आदेशांचे पालन न केल्याने गुन्हे नोंद होत आहेत; परंतु आदेशांचे उल्लंघन न करणार्‍यांची संख्याही वाढत आहे. यातून गुन्हा केवळ नावालाच नोंद होत आहे, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? आपत्काळात समाजाला शिस्त लावण्यासाठी त्वरित कठोर शिक्षा होणेच आवश्यक आहे.


सांगली, ११ एप्रिल – कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सांगली जिल्ह्यात लागू असलेल्या जमावबंदी आदेशाचा भंग करून ८ एप्रिल या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला म्हणून आयोजकांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भाजपच्या पुढाकाराने दळणवळण बंदीच्या विरोधात काढलेल्या या मोर्च्यात व्यापारी संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.