प्रतिदिन ४-५ घंटे पाणी देऊ शकत नसल्यास आम्ही प्रशासन चालवण्यास अपयशी ! – मंत्री नीलेश काब्राल, गोवा

‘‘राज्यात सरकार प्रतिदिन ४-५ घंटे पाणी देण्याचे उद्दिष्ट पुढील काही दिवसांत पूर्ण करू शकणार आहे; मात्र यासाठी नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.’’

कोल्‍हापूर बसस्‍थानकातील नादुरुस्‍त नळ, तसेच अन्‍य त्रुटी दूर करा ! – सुराज्‍य अभियानाचे निवेदन

सध्‍या उन्‍हाळ्‍याचा काळ चालू असून प्रवाशांना पुरेसे आणि स्‍वच्‍छ पाणी न मिळणे, हे अत्‍यंत दुर्दैवी आहे. तरी नादुरुस्‍त नळ, तसेच अन्‍य त्रुटी दूर कराव्‍यात, या मागणीचे निवेदन राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या कोल्‍हापूर विभाग नियंत्रक अनघा बारटक्‍के यांना देण्‍यात आले.

भूखंडाअभावी दारावे ग्रामस्‍थ सामाजिक सुविधांपासून वंचित !

दारावे गावामध्‍ये कार्यक्रमासाठी समाज मंदिर, सांस्‍कृतिक भवन, महिला मंडळासाठी भवन, ज्‍येष्‍ठांसाठी विरंगुळा केंद्र, खेळण्‍यासाठी मैदान हे भूखंड सिडकोकडून मिळाले नाहीत. महापालिकेची स्‍थापना होऊन २८ वर्षे झाली, तरी ग्रामस्‍थ सामाजिक सुविधांपासून वंचित आहेत.

कर्नाटकमध्‍ये ‘अधिवक्‍ता संरक्षण कायदा’ त्‍वरित लागू करा ! – अधिवक्‍ता अमृतेश एन्.पी., कर्नाटक उच्‍च न्‍यायालय

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदूंच्‍या बाजूने लढणार्‍या अधिवक्‍त्‍यांवर झालेल्‍या गोळीबारामागे सूत्रधार कोण ?’, यावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

निगडी (पुणे) पोलीस चौकीत तरुणीची गळफास घेत आत्‍महत्‍या

निगडीतील अल्‍पवयीन मुलगी बेपत्ता झाल्‍याची तक्रार पोलीस ठाण्‍यात प्रविष्‍ट करण्‍यात आली होती. एक तरुणी अल्‍पवयीन मुलीसह असल्‍याचा संशय स्‍वयंसेवी संस्‍थेला आल्‍याने त्‍यांनी कोतवाली पोलीस ठाण्‍यात माहिती दिली.

समलैंगिक विवाहांचा विषय न्यायालयाने नव्हे, तर संसदेने हाताळावा ! – केंद्रशासन

या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असतांना केंद्र शासनाने म्हटले आहे की, अशी अनेक सूत्र आहेत. ती संसदेपुढे गेली, तर बरे होईल. संसदेत प्रतिष्ठित खासदार आहेत. संसदीय समित्यांमध्ये सर्व पक्षांचे सदस्य आहेत.

देऊर (जिल्‍हा सातारा) येथे रानडुकराच्‍या शिकारीसाठी भूमीत पुरलेल्‍या जिलेटिनच्‍या स्‍फोटात एकजण गंभीर घायाळ !

रानडुकराच्‍या शिकारीसाठी भूमीत पुरलेल्‍या जिलेटिनच्‍या स्‍फोटात एक शेतकरी घायाळ झाला आहे. त्‍याला पुढील उपचारांसाठी खासगी रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले आहे.

मुंबईतून जप्‍त केलेले १ सहस्र किलो अंमली पदार्थ नष्‍ट !

अंमली पदार्थांची होणारी तस्‍करी कायमचीच रोखण्‍यासाठी काय प्रयत्न करणार ? हे पोलिसांनी सांगावे !

पिंपरी (पुणे) येथील रावेत भागात वादळी वार्‍यामुळे होर्डिंग्‍ज कोसळल्‍याने ६ जणांचा मृत्‍यू !

रावेत भागात झालेल्‍या मुसळधार पावसामुळे ‘होर्डिंग्‍ज’ कोसळून ६ जणांचा मृत्‍यू झाला असून ३ जण घायाळ झाले आहेत.

एकाही हिंदु व्‍यापार्‍यावर आक्रमण झाले, तर जशास तसे उत्तर देऊ ! – भाजपचे आमदार नितेश राणे यांची चेतावणी

नगर येथील हिंदु व्‍यापार्‍यांवर झालेल्‍या आक्रमणाचे प्रकरण. येथे जिहाद्यांनी केलेले अतिक्रमण आणि त्‍यांची दादागिरी पुष्‍कळ वाढलेली आहे. त्‍यामुळे येथील हिंदु व्‍यापार्‍यांवर मुख्‍य बाजारपेठ सोडून जाण्‍याची वेळ आलेली आहे