दंगलींना ममता बॅनर्जी सरकार उत्तरदायी  ! – मानवाधिकार आयोगाच्या सत्यशोधन समितीचा अहवाल

भाजपशासित राज्यांत अशा दंगली झाल्या असत्या, तर एव्हाना देशातील सर्वच ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी राजकीय पक्ष अन् संघटना यांनी आकांडतांडव केले असते

छत्रपती संभाजीनगर येथील वारसास्थळांवरील सर्व अतिक्रमणे हटवणार !

यासाठी महानगरपालिका, पोलीस प्रशासनासह ही ऐतिहासिक स्मारके आणि वारसास्थळांशी संबंधित यंत्रणेशी चर्चा करून अतिक्रमणे हटवली जातील

२२ एप्रिलला श्री परशुराम जयंतीच्या निमित्त भव्य शोभायात्रा ! – अधिवक्ता विवेक शुक्ल, अध्यक्ष, ब्राह्मण सभा करवीर

२२ एप्रिलला श्री परशुराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने कोल्हापुरातील सर्व ज्ञाती संस्थांच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

नांदेड येथे प.पू. कालीचरण महाराज यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

नांदेड येथील श्रीरामनवमीनिमित्त आयोजित धर्मसभेत प.पू. कालीचरण महाराजांनी एका समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

महाविकास आघाडीच्या नागपूर येथील सभेच्या विरोधात नागरिकांची नागपूर खंडपिठात जनहित याचिका !

दर्शन कॉलनी येथील मैदान परिसर हा रहिवासी भाग आहे. लहान मुले, वयोवृद्ध नागरिक आणि या भागात असलेल्या रुग्णांचा विचार करता या मैदानावरील सभेची अनुमती नाकारावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

प्रशासनाने रत्नागिरी बसस्थानकावरील खड्डे बुजवले, प्रवेशद्वारावरील सांडपाण्याचीही लावली योग्य विल्हेवाट !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वृत्ताचा परिणाम ! यापुढेही प्रतिदिन बसस्थानकाची स्वच्छता राहील, अशी व्यवस्था प्रशासनाने करायला हवी आणि ज्या प्रवाशांकडून अस्वच्छता होते, त्यांना दंड ठोठावयाला हवा. असे केल्यास येथील स्वच्छता टिकून राहील !

विदेशी अर्थपुरवठ्याच्या प्रकरणी ‘बीबीसी इंडिया’विरुद्ध गुन्हा नोंद !

ईडी ‘बीबीसी इंडिया’द्वारे केलेल्या कथित परकीय गुंतवणुकीच्या  (एफ्.डी.आय.च्या) नियमांच्या उल्लंघनाचीही चौकशी करत आहे. यापूर्वी आयकर विभागाने बीबीसीच्या देहली आणि मुंबई कार्यालयांत धाड टाकली होती.

भारतात नियम पाळावे लागतील अन्यथा कारागृहात जावे लागेल ! – ट्विटरचे इलॉन मस्क यांची स्पष्टोक्ती

भारतात सामाजिक माध्यमांवर कठोर निर्बंध आहेत. त्यामुळे आमचे संकेतस्थळ अमेरिका किंवा इतर पाश्‍चात्त्य देशांतील ट्विटर वापरकर्त्यांना जेवढे स्वातंत्र देते, तेवढे समान स्वातंत्र्य भारतीय ट्विटर वापरकर्त्यांना देऊ शकत नाही.

गायनाच्या कार्यक्रमांमध्ये गायक गाण्याऐवजी ओठांची केवळ हालचाल करतात ! – गायक पलाश सेन यांचा दावा

रिअ‍ॅलिटीच्या नावावर तिथे काहीच रिअ‍ॅलिटी (सत्यता) नसते. या शोमध्ये कुठल्याही प्रकारच्या भावना नसतात. तो केवळ एक टीव्ही शो असून तो ‘सास भी कभी बहू थी’ या मालिकेसारखा पहायला हवा.

भरतपूर (राजस्थान) येथे महाराज सूरजमल आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसवण्याच्या वादातून हिंसाचार

कुम्हेर चौकात महाराजा सूरजमल, बल्लारा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नगर चौकात भगवान परशुराम यांचा पुतळा बसवण्यात येणार होता.