नांदेड येथील सभेत प.पू. कालीचरण महाराज
नांदेड – जिल्ह्यातील बिलोली येथे आयोजित धर्मसभेत चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी प.पू. कालीचरण महाराज यांच्या भारतीय दंड विधान संहिता कलम १५३ अ, २९५ अ आणि ५०५-२ नुसार या कलमांद्वारे (विरोधात दंगल भडकणे, विशिष्ट समाजाच्या भावना दुखावणे, २ समाजात तेढ निर्माण करणे) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
९ एप्रिल या दिवशी बिलोली येथे श्रीरामनवमीनिमित्त ही धर्मसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत प्रमुख वक्ते म्हणून प.पू. कालीचरण महाराज यांनी भाषण केले होते.
Maharashtra: FIR against Kalicharan Maharaj for hate speech https://t.co/FJc8dpZhhx
— TOI Cities (@TOICitiesNews) April 13, 2023
नेमका आरोप काय ?
नांदेड येथील श्रीरामनवमीनिमित्त आयोजित धर्मसभेत प.पू. कालीचरण महाराजांनी एका समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, ‘भारतात दंगली मुसलमान समाजामुळेच होतात.’ ‘प.पू. कालीचरण महाराजांनी त्यांच्या भाषणाच्या वेळी लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला’, असा पोलिसांचा आरोप आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी स्वतः तक्रारदार होऊन ही कारवाई केली आहे.
संपादकीय भूमिकाया ठिकाणी एखादा मौलाना किंवा धर्मांध नेता असता, तर पोलिसांनी त्यांच्या विरोधात स्वतःहून तक्रारदार होऊन गुन्हा नोंद करण्याचे धाडस केले असते का ? यावरून पोलीसयंत्रणा धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि संत यांची गळचेपी करतात, हे लक्षात येते. |