विदेशी अर्थपुरवठ्याच्या प्रकरणी ‘बीबीसी इंडिया’विरुद्ध गुन्हा नोंद !

नवी देहली – विदेशातून झालेल्या अर्थपुरवठ्याच्या प्रकरणी  अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ‘बीबीसी इंडिया’वर ‘फेमा’ (फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्ट) कायद्यांर्गत गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा २ आठवड्यांपूर्वी नोंदवण्यात आला होता आणि आतापर्यंत ‘ईडी’ने ‘बीबीसी इंडिया’च्या एका संचालकासह ६ कर्मचार्‍यांची चौकशी केली आहे, असे अधिकार्‍यांनी आता सांगितले.

ईडी ‘बीबीसी इंडिया’द्वारे केलेल्या कथित परकीय गुंतवणुकीच्या  (एफ्.डी.आय.च्या) नियमांच्या उल्लंघनाचीही चौकशी करत आहे. यापूर्वी आयकर विभागाने बीबीसीच्या देहली आणि मुंबई कार्यालयांत धाड टाकली होती.

संपादकीय भूमिका

मुळात भारत आणि हिंदु द्वेषी बीबीसीवर भारतात बंदी घालणेच आवश्यक आहे !