उत्तरप्रदेशातील बरेली येथे मंदिरात घुसून दुर्गामातेच्या मूर्तीची तोडफोड !

अशा हिंदुद्वेष्ट्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

चंडीगड येथील सरकारी शाळेत १३ वर्षीय विद्यार्थिनीवर ५ विद्यार्थ्यांनी अनेक वेळा केला बलात्कार !

अल्पवयीन आरोपींवर कायद्याचा बडगा उगारता येत नाही; पण अशा घटनांतून त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक आहे, हेच लक्षात येते ! अध्यात्मविहीन कायदे बनवणार्‍या भारतीय व्यवस्थेकडे यावर काय उत्तर आहे ?

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर १९ राजकीय पक्षांचा बहिष्कार

संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्याची मागणी करत देशातील १९ विरोधी पक्षांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

भगवा कुर्ता घातलेल्या मुसलमानाला इमामाने मशिदीत येण्यापासून रोखले !

मुसलमानांना हिंदूंविषयी किती घृणा आहे, हेच ही घटना दर्शवते. हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजणारे पुरो(अधो)गामी आता गप्प का ?

भाजप युवा मोर्चाच्या वतीने राहुल गांधी यांचा निषेध !

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी करतांनाचा एका ‘व्हिडिओ’ काँग्रेस पक्षाच्या सामाजिक माध्यमांच्या खात्यावरून प्रसारित झाला आहे. तरी भाजप युवा मोर्चाच्या वतीने याचा निषेध करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले.

शेतकर्यांना दर्जेदार बी-बियाणे आणि खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष रहावे ! – मुख्यमंत्री

शेतकर्‍यांना दर्जेदार बी-बियाणे आणि खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष रहावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

पुणे शहरात २ सहस्र रुपयांच्या नोटा खात्यात जमा करण्यावर भर !

नागरिकांनी नोट पालटून घेण्यापेक्षा ती खात्यात जमा करण्यास भर दिल्याचे दिसून आले. तसेच नोटा पालटून घेण्याची प्रक्रिया सोपी असल्याचेही दिसून आले.

पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडून बालभारतीची पुस्तके सिद्ध !

पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडून बालभारतीची पुस्तके सिद्ध झाली असून लवकरच ही नवी कोरी पुस्तके शाळांमध्ये वितरित होणार आहेत.

‘हर घर सावरकर समिती’ आयोजित ‘हर घर सावरकर’ अभियानाचा रायगड येथे शुभारंभ !

‘हर घर सावरकर समिती’ आयोजित ‘हर घर सावरकर’ अभियानाचा शुभारंभ २१ मे या दिवशी रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून झाला.