भगवा कुर्ता घातलेल्या मुसलमानाला इमामाने मशिदीत येण्यापासून रोखले !

फर्रुखाबाद (उत्तरप्रदेश) येथील घटना

संबंधित मुसलमान हा रा.स्व. संघप्रणीत ‘मुस्लिम राष्ट्रीय मंच’चा जिल्हा समन्वयक !

(इमाम म्हणजे मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा प्रमुख)

भगवा कुर्ता घातलेला मुसलमान इमाम

फर्रुखाबाद (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील शमशाबाद येथे भगवा कुर्ता परिधान केलेली एक मुसलमान व्यक्ती एका मशिदीत प्रवेश करत असतांना तिला तेथील इमामाने रोखले. आसिफ अली खान असे या व्यक्तीचे नाव असून इमामाने त्यांचा अपमानही केला, असा खान यांनी आरोप केला आहे. या प्रकरणी इमाम महताब हाफिज याच्याविरोधात पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून घटनेचे अन्वेषण केले जात आहे.

आसिफ अली खान यांचे म्हणणे आहे की, मी भगवे कपडे घातल्यानेच माझा अपमान करण्यात आला. धर्माला कोणताच रंग नसतो. या वेळी इमामने मला बजावले की, पुन्हा हे कपडे घालून मशिदीत येता कामा नये. जर मुसलमानांचे राज्य असते, तर तू केलेल्या या कृत्यासाठी तुला कोणती शिक्षा देण्यात आली असती, हे दाखवले असते !

पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले की, खान यांनी भगवा कुर्ता घातल्यानेच त्यांना रोखण्यात आले कि यामागे अन्यही काही कारण आहे, हे पहात आहोत. अन्य काही वृत्तांनुसार आसिफ अली खान हे रा.स्व. संघप्रणीत ‘मुस्लिम राष्ट्रीय मंच’चे जिल्हा समन्वयकही आहेत.

संपादकीय भूमिका

  • मुसलमानांना हिंदूंविषयी किती घृणा आहे, हेच ही घटना दर्शवते. हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजणारे पुरो(अधो)गामी आता गप्प का ?