घणसोली (नवी मुंबई) येथील अनधिकृत इमारत पुन्हा पाडणार !

घणसोली येथील ‘ओम साई अपार्टमेन्ट’ ही ४ मजली अनधिकृत इमारत पाडण्याचे आदेश नवी मुंबई महापालिका आणि सिडकोला दिले. ‘बेकायदा बांधकाम नियमित करण्यास अनुमती देता येणार नाही’, तसेच ‘बेकायदेशीर आणि अनियमितता यांत भेद आहे’, असे मुंबई  उच्च न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.

संसदेच्या कायद्याची कार्यवाही करायची नसेल, तर कायदा करता कशाला ?

अपंगांच्या समस्या निवारण्यासाठी स्थापन केलेले राज्य सल्लागार मंडळ गेल्या ४ वर्षांहून अधिक काळ कार्यरत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने २७ मार्च या दिवशी राज्य सरकारला धारेवर धरले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास ‘शिवसृष्टी’तून सर्वांना समजेल ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

छत्रपतींनी शेती, व्यापार, स्वधर्म, स्वभाषा या गोष्टींचा विचार केला होता, असे प्रतिपादन ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

सातारा येथे झाडे नष्ट करणार्‍यांविरुद्ध २ गुन्हे नोंद !

आम्ल टाकून झाडे नष्ट करणार्‍यांची विकृती ठेचण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : नैराश्यातून १४ वर्षांच्या मुलीची घरी आत्महत्या !; गडचिरोली येथे चकमकीत नक्षलवादी पळून गेले !…

प्रत्येकच गुन्हेगाराचा शोध अल्प वेळेत लागला, तर राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण न्यून होईल ! नक्षलवाद समूळ नष्ट होण्यासाठी सरकार कोणती पावले उचलणार ?

पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ ५६ टी.एम्.सी. पाणीसाठा !

जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये मिळून २७ मार्च या दिवसापर्यंत ५६.३९  टी.एम्.सी. एवढा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा केवळ २ महिने पुरेल इतकाच आहे.

मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिक !

भीषण पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने व्यापक जनजागृतीसह ठोस उपाय काढणे आवश्यक !

सातारा पोलिसांकडून २२ सराईत गुन्हेगारांची अवैध घरे भुईसपाट !

घरे बनेपर्यंत प्रशासन झोपले होते का ?

पुणे जिल्ह्यातील सिंहगडाच्या जंगलामध्ये वणव्यांचे प्रमाण वाढले

वणवा लावणार्‍या अशा विकृत प्रवृत्तींना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

शिमगोत्सवाच्या निमित्ताने भरणे येथील श्री काळकाईदेवीला जिल्हा पोलीस दलाने दिली मानवंदना !

शासकीय सलामीसाठी शिवसेना नेते रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मानवंदना सोहळा पहाण्यासाठी मंदिर प्रांगणात भक्तांची गर्दी उसळली होती.