प्रमोद काळूवाला यांच्याकडून ‘सुदर्शन राष्ट्रनिर्माण ट्रस्ट’साठी १० सहस्र रुपयांचे आर्थिक साहाय्य !

माहीम येथील प्रमोद काळूवाला या राष्ट्र आणि धर्म प्रेमीने ‘सुदर्शन राष्ट्रनिर्माण ट्रस्ट’साठी १० सहस्र रुपयांचे आर्थिक साहाय्य केले. हिंदु असल्याचा अभिमान असल्याने धर्मकार्यासाठी साहाय्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील ४० गोशाळा ‘स्मार्ट गोशाळा’ म्हणून विकसित करणार ! – शेखर मुंदडा, अध्यक्ष, गोसेवा आयोग

देशी गोवंशियांच्या संवर्धनासाठी राज्यातील ४० गोशाळा ‘स्मार्ट गोशाळा’ म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या साहाय्यातून हा ‘स्मार्ट गोशाळा’ प्रकल्प साकारणार आहेत, अशी माहिती ‘गोसेवा आयोगा’चे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली.

वनक्षेत्रातील अवैध वृक्षतोड आणि माती चोरी रोखण्यात अपयश !

तालुक्यातील राखीव वनक्षेत्रात चालू असलेली अवैध वृक्षतोड आणि माती चोरी रोखण्यात अपयश आल्याने दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांना निलंबित केले आहे.

मराठा आरक्षणाला आमचा कायम पाठिंबा ! – नीतेश राणे, आमदार, भाजप

‘मराठा आरक्षणाला आमचा कायम पाठिंबा आहे. आम्ही त्यांना कायम पाठिंबा दिला आहे, तसेच जरांगे पाटील यांना ‘तुम्ही राजकीय टीका करू नका’, हेच आम्ही सांगत आहोत’, असे भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी म्हटले आहे.

सरकारने मराठ्यांचे कुणबीकरण थांबवावे ! – छगन भुजबळ, मंत्री

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यायला आमचा पाठिंबा आहे; मात्र ‘ओबीसी’तून आरक्षण देण्याला विरोध आहे; कारण अलीकडे अनेक मराठा समाजाच्या लोकांना खोट्या नोंदी घेऊन कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया चालू आहे.

गणेशोत्सवात ४ दिवस मध्यरात्री १२ पर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याची अनुमती !

यंदा गणेशोत्सवात ४ दिवस मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास जिल्हाधिकार्‍यांनी अनुमती दिली आहे. वर्षभरातील १५ दिवस सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास अनुमती देण्यात येते.

मराठा सर्वेक्षण अहवाल राज्यशासनाकडे सादर !

‘राज्य सरकारने मराठा आरक्षण अधिसूचना आणि आरक्षणासंबंधित इतर सूत्रांवर चर्चा करण्यासाठी एक दिवसीय २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यात राज्य मागासवर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात येईल

यवतमाळ येथे अपघातामुळे ६ गोवंशियांची तस्करी उघड !

गोवंशहत्या बंदी कायदा असतांनाही होणार्‍या गोतस्करीच्या घटना गोवंशियांचे हत्यारे उद्दाम झाल्याचे दर्शवतात !

१९ आणि २० फेब्रुवारीला ‘रत्नागिरी औद्योगिक महोत्सव’

नवउद्योजकांसह ‘पीएम् विश्वकर्मा योजने’चा लाभ स्थानिकांना मिळवून देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये केवळ २ वर्षांमध्ये ३०१ शस्त्र परवाने !

वर्ष २०१० ते २०२० या कालावधीमध्ये ३७९ जणांना रिव्हॉल्व्हरचे शस्त्र परवाने देण्यात आले आहेत, तर जानेवारी वर्ष २०२२ ते १५ फेब्रुवारी २०२३ म्हणजे केवळ २ वर्षांमध्ये ३०१ शस्त्रपरवाने देण्यात आले