नागपूर येथे क्षुल्लक कारणावरून तरुणींकडून मित्रांच्या साहाय्याने तरुणाची हत्या !

नागपूर – सिगारेट ओढतांना व्हिडिओ घेतल्याच्या क्षुल्लक कारणावरून २ तरुणींनी मित्रांच्या साहाय्याने एका तरुणाला अमानुष मारहाण करत त्याची हत्या केली. रणजित राठोड (वय २८ वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे, तर जयश्री पानझारे (वय ३० वर्षे), सविता सायरे (वय २४ वर्षे) यांच्यासह आकाश राऊत (वय २९ वर्षे) आणि २ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे.

संपादकीय भूमिका

संयमाअभावी टोकाचे पाऊल उचलणारी तरुण पिढी पहाता देशाचे भवितव्य धोक्यातच !