हडपसर (पुणे) येथे मंदिर आणि मंदिरांचे पावित्र्य यांच्या रक्षणार्थ महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या मंदिर विश्वस्तांची बैठक !

मंदिरांशी संबंधित विविध विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन !

बैठकीमध्ये उपस्थित (डावीकडून) सर्वश्री सागर तुपे, सुरेश फडतरे, पराग गोखले, दीपक आगवणे आणि अनुभव कथन करतांना श्रीमती संगीता ताई ठकार

हडपसर (जिल्हा पुणे), ८ एप्रिल (वार्ता.) – मंदिर आणि मंदिरांचे पावित्र्य यांच्या रक्षणार्थ अन् गुढीपाडव्यानिमित्त मंदिरात सामूहिक गुढीपूजन याविषयी मंदिर विश्वस्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नुकत्याच हडपसर येथील राधाकृष्ण मंदिर, तुकाई टेकडी येथे आयोजित केलेल्या बैठकीत पुरंदर, हवेली आणि पुणे शहर पंचक्रोशीतील मंदिर विश्वस्त बैठकीस उपस्थित होते. श्री राधाकृष्ण मंदिराच्या वतीने बैठकीचे नियोजन केले होते. या वेळी वस्त्रसंहितेचा (मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली) फ्लेक्स ज्या मंदिरांनी लावला, तेथील भक्तगणांचा कसा प्रतिसाद होता यावर चर्चा झाली. त्यात श्री ग्रामदैवत कसबा गणपति मंदिर यांच्या प्रमुख ट्रस्टी श्रीमती संगीता ताई ठकार यांनी त्यांचे वस्त्रसंहितेच्या फ्लेक्स संबंधीचे अनुभव कथन केले. या बैठकीमध्ये पुष्कळ मंदिर ट्रस्टी पुणे जिल्ह्यातून उपस्थित होते.

‘सनातन गौरव दिंडी’मध्ये उपस्थित रहाण्याचे आवाहन !

सनातन रौप्य महोत्सव निमित्त काढण्यात येणार्‍या ‘सनातन गौरव दिंडी’मध्ये उपस्थित रहाण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले. २१ एप्रिल २०२४ या दिवशी ‘सनातन गौरव दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘या दिंडीमध्ये आम्ही नक्की उपस्थित राहू’, असे सर्वच मंदिर ट्रस्टींनी उत्स्फूर्तपणे सांगितले.

बैठकीमध्ये उपस्थित (डावीकडून) श्री. सागर तुपे, श्री. सुरेश फडतरे, श्री. पराग गोखले, श्री. दीपक आगवणे