पुणे – येथील जंगली महाराज रस्त्यावर वर्ष २०१२ मध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोट प्रकरणातील आरोपी फिरोज उपाख्य हमजा अब्दुल सय्यदचा मुंबईतील जे. जे. रुग्णालयात ७ एप्रिलला उपचारांच्या वेळी मृत्यू झाला. सय्यदला कर्करोगाने ग्रासले होते. त्याची प्रकृती खालावल्याने एक महिन्यापूर्वी त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले होते.
कोण होता फिरोज सय्यद ?
येथील जंगली महाराज रस्त्यावर वर्ष २०१२ मध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोट प्रकरणात पुणे पोलीस, आतंकवादविरोधी पथक आणि देहली पोलीस यांनी ८ जणांना अटक केली होती. त्यात सय्यदचा समावेश होता. आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. या गुन्ह्याचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवण्यात आले होते. फिरोज सय्यद हा लष्कर परिसरात टेलरिंगचा व्यवसाय करीत होता. तो ‘लष्कर-ए-तय्यबा’चा आतंकवादी फैय्याज कागझीच्या संपर्कात असल्याचा पोलिसांचा दावा होता