नक्षलग्रस्त गडचिरोली मतदारसंघात मतदानपेट्यांसाठी २९ लाखांचा सुरक्षा कक्ष बांधण्यात येणार !

प्रतिकात्मक छायाचित्रं

मुंबई, ८ एप्रिल (वार्ता.) – गडचिरोली जिल्ह्यात अहेरी, आरमोठी आणि गडचिरोली ही तीनही लोकसभा मतदान केंद्रे निवडणूक आयोगाकडून नक्षलग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांत पाठवण्यात येणार्‍या मतपेट्यांच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी राज्यशासनाकडून २९ लाख ४५ सहस्र रुपये व्यय करून सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम) बांधण्यात येणार आहे. या कक्षामध्ये मतमोजणी केंद्रे, मतदानानंतर मोहोरबंद मतदान यंत्रे आणि ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रे ठेवण्यात येणार आहेत.