शनिशिंगणापूर (अहिल्यानगर) येथे मंदिराच्या पश्चिमेला नवे प्रवेशद्वार ! 

भाविकांना पानसतीर्थ प्रकल्पाचेही घडणार दर्शन !

शनिशिंगणापूर (अहिल्यानगर) – शनिशिंगणापूरला भुयारी दर्शन महाद्वाराकडे जाण्यासाठी आता देवस्थान वाहनतळालाच मंदिराच्या पश्चिम दिशेला नवीन प्रवेशद्वाराचे बांधकाम चालू आहे. यामुळे शनिभक्तांचा थेट ‘भुयारी दर्शन महाद्वारा’त प्रवेश होऊ शकणार आहे. शिंगणापूर येथे नवीन भुयारी दर्शन महाद्वार भक्तांच्या सोयीसाठी झाले आहे. त्यापूर्वी शनिमंदिराजवळ राहुरी मार्गावर पूर्वेला प्रवेशद्वार होते. भुयारी दर्शन मार्ग मंदिराच्या पश्चिमेला असून या मार्गांवरून भक्तांना पानसतीर्थ प्रकल्प बघता येतो. कारण या दर्शन मार्गाची रचना भाविक-भक्तांसाठी तशी करण्यात आली; मात्र दर्शन महाद्वाराकडे जाण्यासाठी देवस्थान मालकीच्या वाहनतळावरच जावे लागते. भुयारी दर्शन मार्गामुळे शनिभक्तांना आता ऊन, पाऊस यांपासून संरक्षण मिळेल.