मुंबई – ९ एप्रिल या दिवशी राज्यभरात गुढीपाडव्याचा सण उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. राज्यात अनेक ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यातील प्रमुख नेत्यांनीही सहभाग घेतला. ठिकठिकाणी विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
ठाणे, डोंबिवली अशा ठिकाणी निघणार्या शोभायात्रा आकर्षणाचा विषय ठरल्या. या शोभायात्रांमध्ये विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यात चित्ररथ सहभागी झाले होते. गुढीपाडव्यानिमित्त डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणेशाच्या पालखीचे पूजन महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ठाणे येथे कौपिनेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. गिरगाव येथे महिलांनी नवरात्रीच्या देवींची वेशभूषा केली होती. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुटुंबासह गुढीचे पूजन केले. नागपूर येथील शोभायात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले