अंधेरी सबवे पूरमुक्त करण्यासाठी ३ – ४ वर्षे लागतील !

अंधेरी सबवे (संग्रहित चित्र)

मुंबई – पावसाळ्यात अंधेरी सबवेमध्ये पाणी साचू नये; म्हणून महापालिका प्रशासनाने विविध कामे हाती घेतली आहेत. पाण्याचा निचरा वेगाने करण्यासाठी सबवेला समांतर रेल्वे रुळांखालून पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. तसेच नाला रुंदीकरणाची आणि नाला वळवण्याचीही कामे हाती घेण्यात येणार असून या कामांसाठी सुमारे २०९ कोटी खर्च येणार आहे. ही सर्व कामे पूर्ण होण्यास ३ ते ४ वर्षे लागतील. ती होईपर्यंत पावसाचे पाणी साचल्यास वाहतूक थांबवणे हाच एकमेव पर्याय असेल.