२ संशयित नवी मुंबईतून कह्यात, एकाची ओळख पटली !

अभिनेते सलमान खान यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने २ संशयितांना नवी मुंबईतून कह्यात घेतले आहे.

मांगवली येथे अरुणा धरणाच्या कालव्याचे पाईप आगीत जळून खाक

तालुक्यात मांगवली येथे १४ एप्रिल या दिवशी लागलेल्या आगीत अरुणा धरणाच्या कालव्यासाठी ठेवण्यात आलेले पीव्हीसी पाईप जळून खाक झाले.

विकासाच्या नावाखाली चालू असलेल्या वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वनविभागाची कारवाई !

मुळशी तालुक्यात विकासाच्या नावाखाली विनापरवाना चालू असलेल्या वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वनविभागाने मोठी कारवाई केली. प्रशासकीय अनुमतीविना ८०० झाडे तोडणार्‍या विकासावर कारवाई करून वनविभागाने ८ लाख रुपयांचा दंड ठोठावला.

आजच्या संगणकयुगातील दैनंदिन जीवनात नवनाथांचा आधार अनुभवा ! – नाथ संप्रदायाचे संशोधक तथा प्रवचनकार मिलिंद चवंडके

नवनाथांनी अवतार घेऊन तप सामर्थ्याचे अलौकिक दर्शन घडवत आपल्यास जीवनोपयोगी संदेश दिले आहेत. ‘या संदेशरूपाने नवनाथांचा आधार अनुभवत जीवनाचा आनंद घ्या’, असे आवाहन नाथ संप्रदायाचे संशोधक तथा प्रवचनकार श्री. मिलिंद चवंडके यांनी केले.

विशेष सरकारी अधिवक्त्यांना वेळ नाही म्हणून खटला लांबवू नये, तसेच जामीन अर्जावरच्या सुनावण्या प्रलंबित राहू नयेत !

अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी न्यायालयाला सांगितले, ‘‘या प्रकरणात ३-३ सरकारी अधिवक्ते असतांनाही विशेष सरकारी अधिवक्ता हर्षद निंबाळकर जाणीवपूर्वक खटल्यांच्या दिनांकांना अनुपस्थित राहून खटला लांबवत आहेत, याची न्यायाधिशांनी नोंद घ्यावी.

कात्रज येथे आनंद मेळ्यात विजेच्या झटक्याने शाळकरी मुलाचा मृत्यू !

कात्रज परिसरात ‘फॉरेन सिटी प्रदर्शना’मध्ये वडिलांसोबत गेलेल्या गणेश पवार या ८ वर्षांच्या शाळकरी मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी प्रदर्शनाचे संयोजकांसह विद्युत् पाळण्याच्या मालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

पोलीस भरतीसाठी इच्छुक मुला-मुलींनी पाहिला स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट !

येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान’च्या वतीने पोलीस भरतीसाठी इच्छुक मुला-मुलींना स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट दाखवण्याचा संकल्प सोडण्यात आला होता.

मुंबईतील वाहनांच्या संख्येवर वेळीच आवर न घातल्यास संपूर्ण शहर बंद पडेल ! – वाहतूक तज्ञ

मुंबईत गाड्यांच्या संख्येत बेसुमार वाढ झाली आहे. या आठवड्यात मुंबईत ४६ लाख एवढी वाहनसंख्या झालेली आहे. प्रतिकिलोमीटर २ सहस्र ३०० गाड्या आहेत.

उंचगाव यात्राकाळात अखंडित वीजपुरवठा करा ! – राजू यादव

उंचगाव मंगेश्वर मंदिराची त्रैवार्षिक यात्रा १९ ते २४ एप्रिल या काळात होत असून सध्या कडक उन्हाळा असल्याने विजेची मागणी अधिक आहे. यात्राकाळात मंदिरासह अनेक ठिकाणी विद्युत् रोषणाई होते. तरी विजेच्या पुरवठ्यावर अतिरिक्त भार येऊन वीजपुरवठा खंडित होऊ शकतो.

जामीन देण्यासाठी बनावट कागदपत्रे सिद्ध करणार्‍यास अटक !

जामीन मिळवण्यासाठी न्यायालयामध्ये जामीनदाराचे बनावट आधारकार्ड आणि ७/१२ चा उतारा सादर करणार्‍या योगेश सूर्यवंशी अन्य १ या २ जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.