सेवामुक्त करण्यात आलेल्या परिचारिकांना पुन्हा सेवेत घेण्याच्या मागणीसाठी परिचारिकांचे निषेध आंदोलन

काही दिवसांपूर्वी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या जळीत प्रकरणाच्या संदर्भात चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर ७ लोकांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

राज्यातील बर्ड फ्ल्यू हानीग्रस्तांना भरपाई देणार – सुनील केदार, पशूसंवर्धन मंत्री

बाधित क्षेत्राच्या १ कि.मी. परिघातील कुक्कुट पालकांना, जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले त्यांचे कुक्कुट आणि इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची हानीभरपाई दिली जाणार आहे.

१३ वर्षे संघर्ष करूनही न्याय मिळत नसल्याने प्रजासत्ताकदिनी आत्मदहन करणार !

देशासाठी हुतात्मा झालेल्या सैनिकाच्या वीरपत्नीस जर १३ वर्षे न्याय मिळत नसेल, तर प्रशासनासाठी हे लज्जास्पद आहे !

खानयाळे येथे तिलारी धरणाचा कालवा फुटला

तालुक्यातील तिलारी धरणाचा उजवा तीर कालवा खानयाळे येथे  फुटला. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे, तसेच दोडामार्ग-तिलारी राज्यमार्गावर आवाडे येथे नदीला पूर येऊन पुलावर पाणी आल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.

कायमस्वरूपी जागा देण्याची रवि जाधव यांची मागणी मान्य करणे शक्य नाही ! – नगराध्यक्षांचे स्पष्टीकरण

रवि जाधव यांनी व्यवसायासाठी जागा मिळावी, यासाठी आंदोलन चालू केले आहे. याविषयी नगराध्यक्ष परब म्हणाले, सध्या दिलेल्या हंगामी स्टॉलच्या ठिकाणी कायमस्वरूपी जागा मिळावी, ही जावध यांची मागणी मान्य होणे शक्य नाही; कारण नगरपरिषदेने न्यायालयीन प्रक्रिया करून ही जागा रिक्त केली आहे.

रेडी येथील युवकांना रोजगार द्या अन्यथा प्रकल्पासाठी घेतलेल्या भूमी परत करा ! – प्रीतेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य

तालुक्यातील रेडी येथील बंद पडलेल्या टाटा मेटालिक कंपनीच्या जागेत नवीन प्रकल्प चालू करा अन्यथा शेतकर्‍यांच्या घेतलेल्या भूमी त्यांना परत करा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती तथा विद्यमान सदस्य प्रीतेश राऊळ यांनी केली आहे.

सिंधुदुर्गात होणारी गुटखा विक्री तात्काळ बंद करण्याची शासनाकडे मागणी

गुटखा विक्री व्यवसाय तात्काळ बंद करावा अन्यथा राज्य सरकारने २६ जानेवारी या प्रजासत्ताकदिनापासून सिंधुदुर्ग जिल्हा गुटखा विक्री केंद्र म्हणून घोषित करावा, या मागणीसाठी महालक्ष्मी दिव्यांग आणि निराधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे.

मद्यधुंद टँकर चालकाने १५ वाहनांना ठोकले : ७ जण गंभीर

मद्य पिऊन वाहन चालवणार्‍यांवर कठोर कारवाई केल्यास इतरांना धाक बसेल.

कराड येथे मृत पक्षी आढळून येत असल्याने भीतीचे वातावरण

पक्षी कोणत्या कारणामुळे मृत झाले आहेत, याविषयी अजून कोणतेही निदान झालेले नाही.