सिंधुदुर्गातील कोरोनाची सद्य:स्थिती

१. गत २४ घंट्यांतील नवीन रुग्ण १२

२. आतापर्यंतचे एकूण रुग्ण ६ सहस्र १६६

३. बरे झालेले एकूण रुग्ण ५ सहस्र ७८६

४. उपचार चालू असलेले एकूण रुग्ण २१०

५. मृत्यू झालेले एकूण रुग्ण १६४

कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने कणकवली प्रांत कार्यालय आज बंद

२४ जानेवारीला कणकवली कार्यालयातील कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने २५ आणि २६ जानेवारी या दिवशी संपूर्ण कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे. या कार्यालयात कणकवली, देवगड आणि वैभववाडी या ३ तालुक्यांतील नागरिक महसूल विभागाच्या अनुषंगाने असलेल्या कामांसाठी येत असतात. त्यामुळे कार्यालयात मोठी गर्दी असते. त्यामुळे कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.