इंदापूर तालुक्यामधील (जिल्हा पुणे) इयत्ता ९ ते १२ वी पर्यंतच्या ३३ शाळा चालू

इंदापूर तालुक्यात १०४ शाळा असून त्यात १८ सहस्र ६१० विद्यार्थी आहेत. त्यातील ३३ शाळा पहिल्या दिवशी चालू झाल्या आणि त्यामध्ये १ सहस्र ३८८ विद्यार्थी उपस्थित होते.

नियमांचे उल्लंघन करत वाढदिवस साजरा करणार्‍या भाजप नगरसेवकावर गुन्हा !

२२ नोव्हेंबरच्या रात्री नीलेश बाविस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रमंडळींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रात्री विलंबापर्यंत ही मेजवानी चालू असल्याने काही नागरिकांनी खारघर पोलीस ठाण्यात दूरध्वनीद्वारे तक्रारी केल्या.

आळंदीकरांच्या आरोग्याचा विचार करून कार्तिकी यात्रेचे आयोजन करावे ! – आळंदी ग्रामस्थांची मागणी

यंदा आळंदीची कार्तिकी यात्रा ८ ते १४ डिसेंबर या कालावधीत आहे. तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये प्रतिवर्षी कार्तिकी एकादशीला ७ ते ८ लाख भाविक आळंदीत येत असतात.

शासकीय रुग्णालयांत गोरगरीब रुग्णांकडून पैसे घेतल्यास वाईट परिणाम होतील ! – आमदार नीतेश राणे यांची चेतावणी

शासकीय रुग्णालयात कुठल्याही गरीब व्यक्तीकडून पैसे घेण्याचा प्रयत्न येथील डॉक्टरांनी करू नये.

आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीचे मंदिर दर्शनासाठी खुले

. श्री भराडीमातेच्या मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या सर्व भाविकांनी कोरोनाविषयक नियम पाळण्याचे भाविकांना आवाहन

गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार्‍यांची आजपासून ‘स्क्रिनिंग टेस्ट’ केली जाणार ! – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

प्रतिदिन गोव्यात कामानिमित्त ये-जा करणार्‍यांची होणार तपासणी

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हा ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गुरुकृपायोगानुसार साधना आणि स्वभावदोष-अहंनिर्मूलन प्रक्रिया प्रतिदिन राबवून ईश्‍वराची कृपा संपादन करूया, असे प्रतिपादन सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले.

सिंधुदुर्गात २२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या १९६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत.

वीजमीटर खंडित कराल, तर खबरदार ! – गणेश नाईक, आमदार, भाजप

कोरोनाच्या काळात जनतेवर लादलेली वाढीव वीजदेयके तातडीने रहित करा, अशी मागणी करत ‘ग्राहकांचे वीजमीटर खंडित करण्यासाठी आलात, तर खबरदार’, अशी चेतावणी आमदार गणेश नाईक यांनी महावितरणला दिली आहे.

परिस्थिती पाहून ८ ते १० दिवसांमध्ये दळणवळण बंदीचा निर्णय घेतला जाईल ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

दिवाळीच्या कालावधीत रस्त्यांवर झालेल्या गर्दीमुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, तसेच तज्ञांकडून कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे पुढील ८ ते १० दिवसांमध्ये परिस्थिती पाहून दळणवळण बंदीचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २२ नोव्हेंबर या दिवशी दिली.