आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीचे मंदिर दर्शनासाठी खुले

कोरोनाविषयक नियम पाळण्याचे भाविकांना आवाहन

श्री भराडीदेवीचे मंदिर

मालवण – तालुक्यातील आंगणेवाडी येथील प्रसिद्ध श्री भराडीदेवी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. भाविकांना सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत देवीचे दर्शन घेता येणार आहे. श्री भराडीमातेच्या मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या सर्व भाविकांनी कोरोना महामारीसंबंधी शासनाने घोषित केलेल्या सर्व नियमांचे पालन करावे, तसेच आंगणे कुटुंबियांनी नेमलेले स्वयंसेवक ज्या सूचना करतील, त्यांचे पालन करूनच मंदिरात प्रवेश करावा, असे आवाहन आंगणे कुटुंबियांनी केले आहे. भाविकांनी दर्शनास येतांना कोणतेही पूजासाहित्य, ओटी, प्रसाद आदी आणू नये, तसेच मंदिरात ठेवू नये. मंदिरात देवीच्या होणार्‍या विविध धार्मिक विधींसाठी दर्शन बंद ठेवण्याचा अधिकार आंगणे कुटुंबीय (आंगणेवाडी) यांचा असेल, असे आंगणे कुटुंबियांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.