शेळ-मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प रहित करा अन्यथा मुख्यमंत्री निवासस्थानासमोर आंदोलन छेडू

शेळ-मेळावली येथील ग्रामस्थांनी प्रस्तावित आयआयटी प्रकल्प पुढील आठवड्याच्या आत रहित करून तो अन्यत्र स्थलांतरित करा अन्यथा यापुढे शेळ-मेळावली येथील ग्रामस्थ मुख्यमंत्री निवासस्थानासमोर आंदोलन छेडतील.

मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर जीवरक्षकांचा संप मागे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जीवरक्षकांना ‘गोवा मानव संसाधन विकास महामंडळा’च्या माध्यमातून सरकारी सेवेत रूजू करणार असल्याचे आश्‍वासन दिल्यानंतर येथील आझाद मैदानात गेले एक मास आंदोलन करणार्‍या जीवरक्षकांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले आहे.

नववर्षारंभाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे, किल्ले आदी ठिकाणी होणार्‍या गैरप्रकारांना आळा घाला !

हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून हे का रोखत नाही ?

गोव्यात ‘जनता कर्फ्यू’ लादण्याचा विचार नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोव्यात ‘जनता कर्फ्यू’ लादण्याचा शासनाचा विचार नाही, तसेच या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्रालयाकडूनही काही विशेष सूचना आलेल्या नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

आगामी विधानसभा निवडणुकीत मगो भाजपशी युती करणार नाही !

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपशी युती करण्याची शक्यता महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष श्री. दीपक ढवळीकर यांनी नाकारली आहे.

मगो पक्षाच्या अध्यक्षपदासाठी जानेवारी २०२१ मध्ये निवडणूक

जानेवारी २०२१ मध्ये पक्षाचे अध्यक्षपद आणि समितीचे इतर सदस्य यांसाठीची निवडणूक घेण्यात येईल, अशी माहिती मगो पक्षाचे अध्यक्ष श्री. दीपक ढवळीकर यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘निवडणुकीसाठी कार्यक्रम ठरवण्यात आला आहे.

गोव्यात नवीन ९० कोरोनाबाधित

गोव्यात २४ डिसेंबरला ९० नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. कोरोनामुळे दिवसभरात १ मृत्यू झाला आहे, तर ८८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंतचे एकूण मृत्यू ७२८ झाले आहेत.

‘आता तुमचे हिंदुत्व कुठे गेले ?’ – गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शिवसेनेचा प्रश्‍न

गोव्यात गोमांसाचा तुटवडा दूर करण्यासाठी भाजप शासनाने अल्पसंख्यांकांची मागणी मान्य केल्याचे प्रकरण !

कुंकळ्ळीतील महानायकांच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पाठ्यपुस्तकात अंतर्भूत करा ! – भारतमाता की जय

१५ जुलै हा दिवस कुंकळ्ळी हुतात्मा दिन म्हणून घोषित करणे, कुंकळ्ळीच्या लढ्यावर चित्रपट बनवणे आणि महानायक हुतात्मा स्मारकाचे विस्तारीकरण अन् सुशोभिकरण करून त्याच्या कायमस्वरूपी देखभालीची व्यवस्था करणे, अशा मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात, असे आवाहन प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी केले.

गोवा मुक्तीलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांची तैलचित्रे विधानसभेत लावा !

सत्तरी इतिहास संवर्धन समितीची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मागणी