पालिका निवडणुकीच्या ३ आठवड्यांपूर्वी आरक्षण सूची घोषित करण्याचा न्यायालयाचा शासनाला आदेश

राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होण्याच्या ३ आठवड्यांपूर्वी प्रभागांच्या आरक्षणाविषयी सूची घोषित करणार असल्याची माहिती गोवा शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाला दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने शासनाचे हे म्हणणे मान्य केले आहे.

गोव्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा १ सहस्र

गोव्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण १ सहस्रहून अल्प झाले होते. ही संख्या २३ डिसेंबरला १२५ नवीन कोरोनाबाधित आढळल्याने पुन्हा १ सहस्र झाली आहे. कोरोनामुळे दिवसभरात २ मृत्यू झाले आहेत, तर ७० रुग्ण बरे झाले आहेत.

फोंडा पालिकेचे नगरसेवक व्यंकटेश नाईक यांची भाजपला सोडचिठ्ठी

फोंडा नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक यांनी भाजपला सोठचिठ्ठी दिली आहे. नगरसेवक व्यंकटेश नाईक यांनी फोंडा भाजप मंडळ समितीच्या सदस्यत्वाचेही त्यागपत्र दिले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची वेर्णा येथील श्री महालसा मंदिराला भेट

गोवा मुक्तीदिन सोहळ्यासाठी आलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वेर्णा येथील श्री महालसा मंदिराला सपत्नीक भेट देऊन देवीकडे सर्वांच्या उन्नतीसाठी प्रार्थना केली. पुरोहितांनी पारंपरिक गार्‍हाणे घालून राष्ट्रविकासाची मागणी केली.

गोवा मांस प्रकल्पात हत्या करण्यासाठी शेजारच्या राज्यांतून पशू आणण्यास नोंदणीकृत दलालांना अनुमती ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

“३० टक्के लोकांसाठी आपल्याला हे करावे लागत आहे”, तर गोव्यातील ७० टक्के हिंदूंच्या भावनांचा तुम्ही कुठेच विचार करत नाही. यापुढे असे चालणार नाही.

स्वराज गोमंतक संस्थेकडून वेर्ला येथे महिलांसाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर

गोवा मुक्तीदिनाचे औचित्य साधून ‘स्वराज गोमंतक’ या संघटनेकडून समाजासाठी विशेषतः महिला आणि युवती यांच्यासाठी अनिवासी स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. वेर्ला-काणका येथील सातेरीनगर क्रीडा मैदानात १६ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२० या कालावधीत हे शिबिर घेण्यात आले.

कोकण इतिहास परिषदेकडून ‘सौंधेकर राजघराण्याचा इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन

कोकण इतिहास परिषद, गोवा शाखेकडून ‘सौंधेकर राजघराण्याचा इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन नागेशी, बांदोडा येथील राजे सौंधेकर घराण्याच्या वाड्यात नुकतेच करण्यात आले.

मडगाव येथील मोतीडोंगरावर राजकीय वरदहस्ताने अवैध बांधकामे होत आहेत ! – परशुराम गोमंतक सेना

एका संघटनेला दिसते ते सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनाला का दिसत नाही ?

मुरगाव शहराला दिलेले वास्को-द-गामा नाव आणि विविध सार्वजनिक ठिकाणांना दिलेली पोर्तुगीज नावे पालटावी ! – भारतमाता की जय संघटना

गेल्या ६० वर्षांत हा पालट झालेला नसणे गोमंतकियांसाठी दुर्दैवी ! टी.बी. कुन्हा यांनी म्हटल्याप्रमाणे ‘गोंमतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा र्‍हास’ तो हाच !

‘गटार आणि रस्ते’ यांच्या पलीकडे जाऊन मानवाच्या विकासाकडे लक्ष देणे आवश्यक ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

पायाभूत सुविधांच्या विकासावरच भर देण्याऐवजी मानवाच्या विकासाकडे प्रत्येकाने लक्ष द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवनिर्वाचित जिल्हा पंचायत सदस्यांना केले.