चीनकडून २ वर्षांनंतर भारतियांवरील व्हिसाबंदी मागे !

गेल्या २ वर्षांपासून कोरोनामुळे चीनने भारतीय व्यावसायिक आणि विद्यार्थी यांना व्हिसा देण्यावर घातलेली बंदी मागे घेण्याची घोषणा केली.

चीनमध्ये बुलेट ट्रेन रुळावरून घसरल्याने चालकाचा मृत्यू  

चीनच्या गुइझोऊ प्रांतात भूस्खलनामुळे बुलेट ट्रेनचे २ डबे रुळावरून घसरल्यामुळे चालकाचा मृत्यू झाला, तर ७ प्रवासी घायाळ झाल्याची घटना ४ जून या दिवशी घडली.

चीनमध्ये कोरोनामुळे २६ शहरांत दळणवळण बंदी

चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या वृत्तपत्राचे माजी संपादक डेंग यूवेन यांच्या मते, नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये, यासाठी जिनपिंग कोरोनाविषयी बोलणे टाळत आहेत.

जगात पहिल्यांदाच माणसामध्ये आढळला बर्ड फ्लूचा संसर्ग

चीनच्या हेनान प्रांतात बर्ड फ्लूच्या ‘एच्३एन्८’ प्रकाराच्या पहिल्या मानवी संसर्गाची नोंद झाली आहे. जगात बर्ड फ्लूचा माणसामध्ये आढळलेला हा पहिलाच संसर्ग आहे.

चीनच्या बीजिंग आणि शांघाय शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ

चीनच्या शांघाय शहरात एकाच दिवसात कोरोनामुळे ५१ मृत्यू झाल्याची नोंद झाली, तर बीजिंगमध्येही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने शहराच्या उच्चभ्रू भागात कोरोनाच्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्या जात आहेत.

चीनमध्ये कोरोनाच्या नव्या संसर्गामुळे २० लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता !

दळणवळण बंदीमुळे चीनच्या विकासदरावर परिणाम होत आहे. चीनचा तंत्रज्ञान उद्योग ठप्प आहे.

चीनमधील २.६ कोटी शांघायवासियांची कोरोना चाचणी होणार !

चिनी सरकारच्या ‘डायनॅमिक झीरो पॉलिसी’ म्हणजे परिस्थितीनुरूप कोरोनाला पूर्ण पायबंद करण्याच्या धोरणामुळे अनेक प्रांतांमध्ये दळणवळण बंदी कठोरतेने राबवली जात आहे.

शांघाय (चीन) शहरात कोरोनामुळे दळणवळण बंदी

चीनमधील महत्त्वाचे औद्योगिक शहर असलेल्या शांघायमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे दळणवळण बंदी लागू करण्यात आली आहे. गेल्या २४ घंट्यांत ४ सहस्रांहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे.

चीनच्या सर्व ३१ प्रांतांमध्ये कोरोनाचा संसर्ग : ५ शहरांत दळणवळण बंदी

चीनच्या सर्व ३१ प्रांतांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी चीनने कार्यान्वित केलेली ‘झीरो कोविड पॉलिसी’ही कुचकामी ठरतांना दिसत आहे.