चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पंतप्रधानांना हटवले !

कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशानातून माजी राष्ट्राध्यक्ष हु जिंताओ यांना बाहेर काढले !

पंतप्रधान ली केकिआंग (डावीकडे) राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (उजवीकडे)

बीजिंग (चीन) – चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे पक्षातील विरोधक असलेल्या पंतप्रधान ली केकिआंग यांना केंद्रीय समितीतून काढण्यात आले आहे. त्यांना पक्षाच्या प्रमुख दायित्वातून मुक्त करण्यात आले आहे. ली केकिआंग यांना शी जिनपिंग यांचे प्रतिस्पर्धी मानले जात होते. ली केकिआंग यांच्या समवेत आणखी तिघांनाही बाहेर काढण्यात आले आहे. केकिआंग यांना समितीतून बाहेर काढण्यात आल्याने कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख होण्याचा शी जिनपिंग यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

दुसरीकडे चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या २० व्या अधिवेशनामध्येच राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या शेजारी बसलेले चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ (वय ७९ वर्ष) यांना अधिवेशनातून बलपूर्वक बाहेर काढण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात सुरक्षारक्षक हू जिंताओ यांना पकडून बाहेर काढतांना दिसत आहेत. हू जिंताओ यांना बाहेर जायचे नव्हते ते त्याचा विरोध करत होते. जिंताओ यांना बाहेर काढण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.