शी जिनपिंग चीनचे तिसर्‍यांदा बनले राष्ट्राध्यक्ष !

माओ यांच्यानंतर अशी कामगिरी करणारे पहिलेच चिनी नेते !

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

बीजिंग – शी जिनपिंग हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनचे तिसर्‍यांदा राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. यामुळे ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चे म्हणजे चिनी सैन्याचे ते प्रमुखही बनले आहेत. चीनच्या साम्यवादी पक्षाचे संस्थापक माओ-त्से-तुंग यांच्यानंतर जिनपिंग असे पहिलेच नेते आहेत, जे तिसरा कार्यकाळ करणार आहेत. माओ साधारण ३ दशक चीनच्या प्रमुखपदी विराजमान होते. या वेळी जिनपिंग म्हणाले की, जगाला चीनची आणि चीनला जगाची आवश्यकता आहे.

जिनपिंग तिसर्‍यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्याने चीनच्या साम्यवादी पक्षाचा ३० वर्षे जुना नियमही तोडण्यात आला आहे, ज्यांतर्गत एका व्यक्तीला अधिकाधिक १० वर्षेच राष्ट्राध्यक्ष रहाता येणार होते.