युक्रेनमध्ये अणूबाँबचा वापर करू नये !

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना थेट आवाहन !

बीजिंग (चीन) – युक्रेनवर अणूबाँबचा वापर करू नये, असे थेट आवाहन चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना केले. ‘अणूबाँबच्या वापराची धमकी देण्याचा आम्ही विरोध करतो’, असेही ते म्हणाले. जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्चोल्स सध्या चीनच्या दौर्‍यावर आहेत. त्यांच्याशी चर्चा करतांना जिनपिंग यांनी वरील आवाहन केले. यासह ‘जर्मनीने रशिया आणि युक्रेन यांच्यात शांतता निर्माण होण्यासाठी चर्चा करण्याचा प्रयत्न करावा’, असेही जिनपिंग यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

शी जिनपिंग यांनी रशियाला अशा प्रकारचे आवाहन करण्यासह स्वतःकडे पाहून ते शेजारी देशांसमवेत काय करत आहेत, याचाही विचार करायला हवा !