चीनमध्ये कोरोना विषाणूने विक्रमी उच्चांक गाठला !

बीजिंग (चीन) – ‘चिनी विषाणू’ या नावाने कुप्रसिद्ध असलेल्या कोरोना विषाणूने चीनमध्ये पुन्हा एकदा कहर केला आहे. डिसेंबर २०१९ मध्ये चीनमध्ये कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला, त्यानंतर आता प्रथमच त्याने पुन्हा एकदा गती पकडली आहे. ‘झिरो कोविड’चे धोरण राबवूनही राजधानी बीजिंगसह गुव्हांझाऊ यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये संक्रमणाने विक्रमी उच्चांक गाठला आहे.

१. २३ नोव्हेंबर या एकाच दिवशी ३१ सहस्र ५२७ जणांना कोरोनाची बाधा झाली. याआधी एप्रिल २०२० मध्ये एकाच दिवसात सर्वाधिक २८ सहस्र चिनी नागरिकांना कोरोनाची बाधा झाली होती.

२. १४० कोटी लोकसंख्या असलेल्या चीनमधील हे प्रमाण अत्यल्प असून आतापर्यंत अधिकृतरित्या केवळ ५ सहस्र २०० चिनी नागरिकच या विषाणूला बळी पडले आहेत. हे प्रमाण १० लाख चिनी नागरिकांमागे ३ बळी, असे असून हेच प्रमाण अमेरिकेतील १० लाख नागरिकांमागे तब्बल ३ सहस्र, तर युनायटेड किंगडममध्ये २ सहस्र ४०० इतके आहे.

३. मुळात चिनी सरकारच्या ‘झिरो कोविड’ धोरणामुळे चिनी अर्थव्यवस्थेला चांगलाच फटका बसला आहे.