सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच साधिकेला स्वयंसूचना सत्र करत असतांना लक्षात आलेले ‘चिकाटी’ या गुणाचे महत्व !

‘३.२.२०२४ या दिवशी मी स्वयंसूचना सत्र करत होते. तेव्हा माझ्या मनात अनावश्यक विचारही येत होते. सत्र एकाग्रतेने होण्यासाठी मी प्रयत्न करू लागले; पण ‘माझे मन पूर्णपणे एकाग्र होत नाही’, असे माझ्या लक्षात येऊन मला निराशा येऊ लागली. तेव्हा मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना शरण जाऊन माझ्या मनाच्या स्थितीचे आत्मनिवेदन केले. तेव्हा माझ्या मनात पुढील विचार आले. 

कु. सुप्रिया जठार

१. स्वभावदोष किंवा अहं यांचे पैलू उफाळून येतात. तेव्हा आपण जर चिकाटीने लढलो नाही, तर स्वभावदोष आणि अहं यांचे आपल्या चित्तावर असलेले संस्कार आणखी दृढ होतात.

२. आपण चिकाटीने प्रयत्न करत राहिलो, तर गुरुकृपा कार्यरत होते आणि आपल्या चित्तावरील स्वभावदोष अन् अहं यांचे संस्कार क्षीण होत जातात. त्यानंतर ते समूळ नष्ट होतात.

३. या समवेतच यशाची अपेक्षा न करता आपण चिकाटीने प्रयत्न करत राहिले पाहिजे. चिकाटीने लढत रहाता येणे, हेही एक प्रकारचे यशच आहे.

हे गुरुमाऊली, ‘आपल्या कृपेमुळेच मला ‘चिकाटी’ हा गुण अंगी बाणवणे किती महत्त्वाचे आहे ?’, याची जाणीव झाली. गुरुमाऊली, वरील विचार देऊन आपण माझ्यामध्ये स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी उत्साह निर्माण केलात. ‘आपल्याला अपेक्षित असे प्रयत्न माझ्याकडून प्रत्येक क्षणी होत राहू दे’, अशी आपल्या चरणी आर्तभावाने प्रार्थना आहे. मी आपल्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’

– कु. सुप्रिया सतीश जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.२.२०२४)