हिंदु मुली न मिळालेल्या हिंदु मुलांनी इतर धर्मियांच्या मुलींशी प्रेमविवाह करावा ! – Yuva Brigade President Chakravarti Sulibele

कर्नाटकातील ‘युवा ब्रिगेड’ या संघटनेचे अध्यक्ष चक्रवर्ती सुलिबेले यांचे आवाहन

‘युवा ब्रिगेड’ या संघटनेचे अध्यक्ष चक्रवर्ती सुलिबेले

बेंगळुरू (कर्नाटक) – विवाहासाठी हिंदु मुली न मिळालेल्या हिंदु मुलांनी इतर धर्मीय मुलींशी प्रेमविवाह करावा. आपण आपल्याच धर्मातील मुलींकडे किती दिवस बघणार ? इतर धर्मीय मुलींशी प्रेमविवाह करा, असा सल्ला ‘युवा ब्रिगेड’ या संघटनेचे अध्यक्ष चक्रवर्ती सुलिबेले यांनी दिला. ते दक्षिण कन्नड जिल्ह्यातील उल्लाळ तालुक्यात असलेल्या कुत्तर या गावी विश्व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या पदयात्रेच्या समारोपप्रसंगी बोलत होते.

सुलिबेले पुढे म्हणाले की,

१. धर्मांतर, लव्ह जिहाद आदी गोष्टी विसरून जा. हिंदु धर्मातून धर्मांतर केलेल्यांना पुन्हा ‘घरवापसी’ (पुन्हा हिंदु धर्मात आणणे) कशी करायची ?, याचे प्रशिक्षण आपल्या तरुणांना द्या.

२. आपण लव्ह जिहादविषयी किती दिवस बोलत रहाणार ? थोडा पालट घडवूया.

३. वक्फ बोर्डाच्या विरोधात देशभरात लढा चालू असतांना राज्य सरकार वक्फ बोर्डाच्या मालमत्तेच्या नूतनीकरणासाठी १५० कोटी रुपये देण्याचा विचार करत आहे. सरकार चिथावणी देऊन फुटीरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.