बुरखा जिहाद !

आपल्या लेकी-सुना, म्हणजेच हल्लीच्या आधुनिक युगात जन्मलेल्या मुलींना साडी आणि ओढणी यांचे ओझे होते. ‘कंफर्टेबल नाही’ (सोयीचे नाही) म्हणतात आणि ‘वेस्टर्न आऊटफीट’ (पाश्चात्त्य पोषाख) घालणे पसंत करतात. त्यातही शरिराला तंग असणारे कपडे असतात आणि शरीर पूर्ण झाकेल असे कपडे घालणे त्यांना नको वाटते. केसांना निदान एक रबर लावणेही सध्याच्या ‘मॉडर्न’ (आधुनिक) युगात ‘वेडेपणाचे’ ठरले आहे. ‘केस मोकळे ठेवून वावरणेच योग्य’, असेच हल्लीच्या मुलींना वाटते. अंगरखा, पायजमा आणि त्यावर ओढणी हा अगदी साधा सोपा पोशाख घालणे म्हणजे मुलींना गावठीपणा वाटतो. ‘गरम होते, ओढणी सांभाळावी लागते, ती लांब असते’, अशी कारणे दिली जातात. पायघोळ पायजमा किंवा सलवार नको. का ? तर म्हणे ‘त्यात आम्ही जाड दिसतो.’ ‘निदान सण, उत्सव आणि शुभप्रसंगी तरी साडी नेसावी’, असे सांगणार्‍या पितृतुल्य पिढीकडेही त्या दुर्लक्ष करतात.

अशाही स्थितीत या आधुनिक युवतींना हिजाब आणि बुरखा घालणे मात्र आवडू लागले आहे. हो, योग्यच वाचत आहात तुम्ही ! त्यांना ‘बुरखा आवडला’ म्हणे. ‘मुंबईमध्ये एके ठिकाणी हिंदु मुलीला रस्त्यात थांबवून मुसलमान मुलगी तिचे मोकळे सोडलेले केस अंबाडा बांधून त्यावर डोके पूर्ण झाकेल, असे घट्ट कापड बांधते. त्यावर काळे कापड चेहरा आणि डोके झाकेल असे गुंडाळून ते मानेभोवती पण गुंडाळते. आपली हिंदु कन्या त्यावर स्मितहास्य करत असते’, असा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. ती मुसलमान मुलगी एवढेच करून थांबत नाही, तर हिंदु कन्येला लांब मोठा झगा, म्हणजे बुरखा घालते आणि तिचे कौतुक करत तिला तिचे छायाचित्र काढून दाखवते. भ्रमणभाषमधील ‘सेल्फी’चे (स्वतः काढलेल्या स्वतःच्या छायाचित्राचे) रूप तिला दाखवून मुसलमान मुलगी तिला विचारते, ‘‘कसे वाटते तुला ?’’ आश्चर्य म्हणजे ‘ड्रेस, ओढणी, वेणी यांना बुरसटपणा’ म्हणणारी तोकडे तंग कपडे घालणारी कन्या म्हणते, ‘‘अच्छा लग रहा है, कंफर्टेबल है, कपडा भी स्मूथ है !’’ (‘‘चांगले वाटते, सोयीचे आहे, कापडही मऊ आहे.’’) हिंदु पालकांनी हे सत्य आणि भयानक वास्तव समाजात घडत आहे, हे लक्षात घ्यावे. ‘आपल्या मुली घराबाहेर जाऊन काय करतात ?’ याकडे पालकांचे लक्ष हवे. मुसलमान त्यांचे कसे धर्मांतर करतात ? लव्ह जिहाद किंवा विविध माध्यमांतून जाळ्यात फसवतात, याचे हे उत्तम उदाहारण आहे. ज्या मुली ओढणीही घ्यायला सिद्ध नाहीत, त्या नखशिखांत डगले घालण्यास आनंदाने सिद्ध होतात. मोकळे केस उडवणार्‍या मुली अंबाडा बांधून डोके घट्ट बांधून घेणे पसंत करते, ती मुलगी मुसलमान धर्म स्वीकारून एखाद्या जिहाद्यासमवेत निघून गेल्यास आणि कालांतराने तिचे तुकडे झाल्याचे ऐकिवात आल्यास नवल वाटू नये !

– सौ. गौरी आफळे, गोवा