५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील चि. युवराज प्रसाद कांगणे (वय १ वर्ष)!

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. युवराज कांगणे हा या पिढीतील एक आहे !

चि. युवराज प्रसाद कांगणे

‘चि. युवराज प्रसाद कांगणे याची त्याचे आई-वडील आणि अन्य कुटुंबीय यांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. जन्मापूर्वी

१ अ. ग्रंथांचे वाचन करणे आणि स्तोत्र म्हणणे : ‘मला गर्भधारणा झाल्यानंतर मी गर्भसंस्कार याविषयीचे काही ग्रंथ वाचले आणि त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न केला. तसेच मी श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथाचे वाचन केले. मी श्रीरामरक्षास्तोत्र म्हणत होते. मी मारुतिस्तोत्र आणि गणपतिस्तोत्र नियमित ऐकत होते.

१ आ. नामजप चालू केल्यावर गर्भातील बाळ शांत होणे : मी नियमित ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत होते. बाळ गर्भात असतांना प्रचंड हालचाल करायचे. मी नामजप चालू केल्यावर गर्भातील बाळ शांत होऊन त्याची हालचाल थांबत असे.

१ इ. मी सात्त्विक आहार घेत होते.

१ ई. मी गर्भातील बाळाला नियमित सांगत होते की, ‘बाळा, तू दिव्य आहेस. बुद्धीमान, सर्वगुणसंपन्न आणि शांत आहेस. भगवान श्रीकृष्ण तुझ्या पाठीशी आहे. तुझा जन्म पृथ्वीवर चांगले कार्य करण्यासाठी होणार आहे.’

२. जन्मानंतर

बाळाच्या जन्मानंतर मला त्याच्या चेहर्‍यावर तेज जाणवत होते.

– सौ. पर्णिका प्रसाद कांगणे (चि. युवराजची आई)

३. वय ३ मास ते १ वर्ष

३ अ. देवाची आवड

१. ‘युवराज घरी आलेल्या प्रत्येकाकडे उत्साहाने जातो. त्यांना वाकून नमस्कार करतो. त्याला ‘तुझा बाप्पा कुठे आहे ?’, असे विचारले की, तो देवघराकडे बघतो.’

– सौ. पर्णिका प्रसाद कांगणे (चि. युवराजची आई)

२. ‘मी कार्यालयातून आल्यावर युवराजला उचलून घेतले की, तो मला देवघराकडे घेऊन जाण्यास सुचवतो.

३. युवराजला गणपतिस्तोत्र आणि गणपतीची आरती ऐकायला अन् ‘गणपति बाप्पा मोरया’, असे म्हणायला पुष्कळ आवडते.’

– श्री. प्रसाद कांगणे (चि.युवराजचे बाबा), चिपळूण, जि. रत्नागिरी.

४. ‘आरतीच्या वेळी त्याला पुष्कळ आनंद होतो. आरती झाल्यावर त्याचे डोके देव्हार्‍याला टेकवल्यावर तो अगदी शांत असतो.’ – श्री. विनायक कांगणे (चि. युवराजचे आजोबा) चिपळूण, जि. रत्नागिरी

५. ‘घरामध्ये कुणीही देवपूजा करत असेल, तर युवराज त्याच्याकडे जाण्याचा हट्ट करतो.

६. युवराजला देवघरासमोर घेऊन गेल्यावर तो नमस्कार करतो. त्याला टाळ आणि घंटा वाजवायला आवडते.’

– सौ. उज्ज्वला कांगणे (चि. युवराजची आजी)

३ आ. ऐकण्याची वृत्ती : युवराज ९ मासांचा असल्यापासून त्याला एका व्यक्तीला नमस्कार करायला सांगितला की, तो तिथे उपस्थित असणार्‍या सर्वांना नमस्कार करतो.’

– श्री. विनायक कांगणे (चि. युवराजचे आजोबा) चिपळूण, जि. रत्नागिरी

३ इ. ‘तो कुणाकडेही रहातो. जी व्यक्ती त्याच्याजवळ असेल, ती व्यक्ती त्याला आपलीशी वाटते.’

– श्री. अनिकेत कांगणे (चि. युवराजचे काका)

३ ई. गुरूंप्रती भाव

१. एक दिवस त्याला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ दाखवला. त्यातील परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्रावर बोट ठेवून तो त्यांच्याशी काहीतरी बोलत होता.’

– सौ. उज्ज्वला कांगणे (चि. युवराजची आजी)

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे भ्रमणभाषवरील छायाचित्र पाहिल्यावर तो पुष्कळ वेळ त्या छायाचित्राकडे पहातो.

– श्री. विनायक कांगणे (चि. युवराजचे आजोबा)

३ उ. चि. युवराज त्याच्या हातातले ‘चॉकलेट’ त्याच्या समवेतच्या मुलांना देतो.’

– सौ. उज्ज्वला कांगणे (चि. युवराजची आजी)

३ ऊ. ‘युवराजचा स्वभाव शांत आहे.

३ ए. युवराजचा स्वभावदोष : हट्टीपणा’

– श्री. विनायक कांगणे (चि. युवराजचे आजोबा)

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ७.१.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.