Bhatkal Cow Murderer Arrest : भटकळ (कर्नाटक) येथे गाभण गायीची हत्या करणार्‍या इब्राहिम महंमद यास अटक

आरोपी इब्राहिम महंमद (उजवीकडे) छायाचित्र सौजन्य : kannadavani.news

भटकळ (कर्नाटक) – कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यामधील भटकळ तालुक्यातील वेंकटपुरा कुकनीर येथे एका गाभण गायीची निर्घृण हत्या करून तिच्या पोटातील वासराला नदीत फेकणार्‍या इब्राहिम महंमद (वय ४५ वर्षे) यास पोलिसांनी अटक केली. इब्राहिम महंमदने वासराला गोणपाटात गुंडाळून वेंकटापुरा नदीत फेकून दिले होते आणि गोमांस पळवले होते. किनार्‍यावर भटकी कुत्री पोते ओढतांना स्थानिकांनी पाहिले. त्यांना त्यामध्ये मेलेले वासरू आढळून आले. त्याचबरोबर त्यांना तेथे गायीची शेपटीही सापडली. स्थानिकांनी तात्काळ ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली होती. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला होता आणि १९ एप्रिलला सायंकाळी भटकळमध्ये इब्राहिम महंमदला अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

कर्नाटकमध्ये काँग्रेसची हिंदुद्वेषी राजवट आल्यापासून दिवसेंदिवस हिंदु धर्मावरील आघातांमध्ये वाढ होत आहे. काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हे आघात मान्य आहेत का ?